शेवगाव येथे १०१ गरोदर मातांना कोरोना प्रतिबंधक लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:26 AM2021-08-20T04:26:44+5:302021-08-20T04:26:44+5:30
शेवगाव : सद्य:परिस्थितीमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार गरोदर मातांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे येथील ग्रामीण रुग्णालयात ...
शेवगाव : सद्य:परिस्थितीमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार गरोदर मातांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे येथील ग्रामीण रुग्णालयात नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील १०१ गरोदर मातांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक रामेश्वर काटे यांनी दिली.
शिबिरास आमदार मोनिका राजळे यांनी भेट देऊन लसीकरणास आलेल्या गरोदर मातांना मार्गदर्शन केले. राजळे म्हणाल्या, कोरोना लसीबाबत अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. मात्र, मनात कोणतीही भीती न बाळगता गरोदर महिलांनी लसीकरण करून घ्यावे. लस पूर्णतः सुरक्षित आहे. तहसीलदार अर्चना पागिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर आयोजित केले होते. यावेळी राजळेंनी येथील ऑक्सिजन प्रकल्प आणि शासकीय कोविड केअर सेंटरला भेट देऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. शिबिर यशस्वितेसाठी गटविकास अधिकारी महेश डोके, डॉ. दीपक परदेशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संकल्प लोणकर, डॉ. कैलास कानडे, डॉ. अतुल शिरसाठ, गायत्री कुमावत, संचिता तुपे, सुशील बडे, संदीप घुले, अजिंक्य महालकर, अमोल काळे, सोनम जायभाये आदींनी प्रयत्न केले.