कोरोना लसीचे काॅकटेल नसावेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:16 AM2021-06-01T04:16:24+5:302021-06-01T04:16:24+5:30
जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ झाला. नगर जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात आतापर्यंत ५ लाख ४४ हजार लोकांनी पहिला, तर ...
जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ झाला. नगर जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात आतापर्यंत ५ लाख ४४ हजार लोकांनी पहिला, तर १ लाख ४३ हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसीचे डोस सध्या घेतले जात आहेत. लसीकरणासाठी मोठी गर्दी होत आहे. अशात पहिला डोस वेगळा व दुसरा डोस वेगळा असे प्रकार काही ठिकाणी होत आहेत. नगर जिल्ह्यात मात्र असा प्रकार झालेला नाही. परंतु लसीचे असे काॅकटेल झाले तर त्याचे काय परिणाम होतात. यावर तज्ज्ञ डाॅक्टरांनी मार्गदर्शन केले आहे. दोन्ही डोस एकाच लसीचे घेतले तर त्याची परिणामकारकता चांगली असते, असेच संशोधनावरून दिसते. तशाच सूचना आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आहेत. त्यामुळे शक्यतो डोसमध्ये बदल होत नाही. मात्र चुकून डोस बदलले तर काय, यावर संशोधन सुरू आहे. सध्या तरी दोन्ही डोस एकाच लसीचे घ्यावेत, यासाठीच आरोग्य कर्मचारी व नागरिकांनी काळजी घ्यावी, असे मत तज्ज्ञ डाॅक्टर व्यक्त करत आहेत.
----------
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण
वयोगट पहिला डोस दुसरा डोस
४५च्या पुढील- ५०७९१० १४३३७८
१८ ते ४४ - २००००
-----------
तज्ज्ञ डॉक्टर्स काय म्हणतात?
कोरोना लसीचे दोन्ही डोस एकच असावेत. ते वेगवेगळे घेण्यात अद्याप परवानगी नाही, परंतु चुकीने असे एखाद्या ठिकाणी घडले असेल तर त्याचा काय परिणाम होतो, याबाबत तज्ज्ञांचा अभ्यास सुरू आहे. आरोग्य यंत्रणेच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे नागरिकांनी एकाच लसीचे दोन्ही डोस घ्यावेत.
- डाॅ. सचिन वहाडणे
---------
दोन्ही डोस एकाच लसीचे दिले तर त्याची परिणामकारकता जास्त असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यामुळेच डोस एक असावा अशा सूचना आहे. त्यानुसार नागरिकांनी जी लस पहिल्या डोसला घेतली त्याचाच दुसरा डोस घ्यावा.
- डाॅ. सतीश सोनवणे
----------
आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दोन्ही डोस एकाच लसीचे हवेत. त्यात बदल करता येत नाही. जर झालाच तर त्याचे काय परिणाम होतात, याबाबत अभ्यास सुरू आहे.
- डाॅ. सुनील पोखरणा, जिल्हा शल्यचिकित्सक
-------
फोटो - ३१काॅकटेल डमी १,२,३,४
--़
(डमी)