CoronaVirus : हिवरेबाजार १५ मे रोजी होणार कोरोनामुक्त गाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 04:33 AM2021-05-09T04:33:09+5:302021-05-09T04:34:08+5:30
हिवरेबाजारमध्ये एप्रिल व मे महिन्यात एकूण ५० व्यक्ती कोरोना संक्रमित झाल्या होत्या. त्यापैकी ३२ रुग्ण गावातील होते तर १८ रुग्ण हे रहिवासी परंतु कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. यातील २ व्यक्तींचा मृत्यू झाला तर ५ रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता होती.
अहमदनगर: आदर्श गाव हिवरेबाजार १५ मे रोजी कोरोनामुक्त होणार आहे. या गावात दोन महिन्यांत ५० जणांना कोरोनाची बाधा झाली होती. यावेळी लक्षणे असलेल्या नागरिकांची त्वरित कोरोना चाचणी, पॉझिटिव्ह रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. तसेच ग्रामस्थांनी नियमांचे पालन केल्याने गाव कोरोनामुक्त होत आहे. पोपटराव पवार हे ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना धीर देत असल्याने रुग्णांचेही मनोबल वाढले आहे. (Corona Virus: Hivrebazar will be a corona free village on 15th May)
हिवरेबाजारमध्ये एप्रिल व मे महिन्यात एकूण ५० व्यक्ती कोरोना संक्रमित झाल्या होत्या. त्यापैकी ३२ रुग्ण गावातील होते तर १८ रुग्ण हे रहिवासी परंतु कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. यातील २ व्यक्तींचा मृत्यू झाला तर ५ रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. सध्या गावात फक्त १ रुग्ण सक्रिय असून, तो नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. १५ मे २०२१पर्यंत हिवरे बाजार गाव कोरोनामुक्त गाव करण्याचा संकल्प ग्रामपंचायत हिवरेबाजारने केला आहे. यासाठी सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन केले आहे.
सध्या शेतीची कामे जोरात सुरू असल्यामुळे शेतात काम करण्यासाठी बाहेरून कोकण, विदर्भ व परिसरातील जवळपास ३०० शेतमजूर येतात.