नागरिकांची काळजी घेणारा ‘कोरोना योद्धा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:33 AM2021-05-05T04:33:35+5:302021-05-05T04:33:35+5:30
घारगाव येथील योगेश भोसले हे रुग्णवाहिका चालक आहेत. रुग्णवाहिकेचे काम सांभाळून ते रस्त्यावर उतरून घारगाव परिसरातील नागरिकांच्या सेवेत गुंतले ...
घारगाव येथील योगेश भोसले हे रुग्णवाहिका चालक आहेत. रुग्णवाहिकेचे काम सांभाळून ते रस्त्यावर उतरून घारगाव परिसरातील नागरिकांच्या सेवेत गुंतले आहेत. स्वतःची व कुटुंबाची काळजी घेऊन जनतेच्या आरोग्याची काळजी वाहणारा हा योद्धा गावासाठी अभिमानाची बाब आहे. भोसले हे दररोज सकाळी लवकर उठून ग्रामपंचायतीच्या वाहनाद्वारे परिसरात ठिकठिकाणी जाऊन कोरोनाविषयी नागरिकांना मार्गदर्शन करत आहे. कोरोनाची गंभीरता व लॉकडाऊनचे महत्त्व ते नागरिकांना दररोज लक्षात आणून देत आहेत.
ऑडिओ क्लिपद्वारे कोरोनाबाबत नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबतच्या उपाययोजना ते सांगत आहेत. तसेच भोसले यांना विनामास्क, विनाकारण फिरताना कोणी आढळून आल्यास त्यास ते जाब विचारतात. यामुळे परिसरात विनामास्क अथवा विनाकारण फिरताना कोणी आढळून येत नाही. भोसले यांच्या नि:स्वार्थी कार्यामुळे कोरोनाचा प्रसार कमी होण्यास नक्कीच हातभार लागत आहे.