मंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नीला कोरोना; मंत्री गडाखही क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 01:56 PM2020-07-18T13:56:58+5:302020-07-18T13:57:46+5:30
राज्याचे जलसंधारणमंत्री व नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल शनिवारी (१८ जुलै) प्राप्त झाला आहे. यामुळे मंत्री गडाख स्वत:हून क्वारंटाईन झाले आहेत.
नेवासा : राज्याचे जलसंधारणमंत्री व नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल शनिवारी (१८ जुलै) प्राप्त झाला आहे. यामुळे मंत्री गडाख स्वत:हून क्वारंटाईन झाले आहेत.
शंकरराव गडाख यांच्या पत्नी व पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख यांचा १७ जुलै रोजी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शंकरराव गडाख यांनी होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचीही १८ जुलै रोजी तातडीने कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. मंत्री गडाख यांनी या संदर्भात स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे. नागरिकांना घरी रहा. सुरक्षित रहा. कुटुंबाची काळजी घ्या, असा सल्लाही त्यांंनी दिला आहे.