श्रीरामपुरात कोरोना उपचारासाठी एक रुग्णालय अधिग्रहीत करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:20 AM2021-04-15T04:20:35+5:302021-04-15T04:20:35+5:30
श्रीरामपूर : शहरातील एक मोठे रुग्णालय अधिग्रहीत करुन पुन्हा ५० ते ६० ऑक्सिजन बेड्सची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न ...
श्रीरामपूर : शहरातील एक मोठे रुग्णालय अधिग्रहीत करुन पुन्हा ५० ते ६० ऑक्सिजन बेड्सची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, दोन दिवसातच त्यावर निर्णय होईल, अशी माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली.
आमदार कानडे यांनी नव्याने उभारलेल्या ५०० बेड्सच्या कोरोना केंद्राला बुधवारी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी प्रांताधिकारी अनिल पवार, पोलीस निरीक्षक संजय सानप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे, ज्ञानेश्वर मुरकुटे, सतीश बोर्डे, राजेंद्र औताडे उपस्थित होते. येथे डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कोरोना महामारी हे नैसर्गिक संकट आहे. सर्वांनी पदाचे मोठेपण विसरून समन्वयाने आणि समर्पित भावनेने काम केले पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या अडचणी प्रशासनाला येऊ देणार नाही. अडचणीच्या काळात चोवीस तास उपलब्ध आहे. त्यामुळे मतदार संघातील नागरिकांसाठी सर्वजण मिळून कष्ट घेऊया, असे आवाहन कानडे यांनी केले.
----------
फोटो ओळी : कानडे
शिरसगाव हद्दीतील कोरोना उपचार केंद्राची बुधवारी आमदार लहू कानडे यांनी पाहणी केली.
-----------