कोरोनामुळे कर्ती व्यक्ती गमावणाऱ्या कुटुंबांना मिळणार युवानचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:20 AM2021-05-09T04:20:59+5:302021-05-09T04:20:59+5:30
कोरोनाची सर्वाधिक झळ कर्ती व्यक्ती गमावणाऱ्या गरीब कुटुंबास बसत आहे. लॉकडाऊनमुळे त्यात अधिकच भर पडली आहे. आधीच दुःखाचा डोंगर ...
कोरोनाची सर्वाधिक झळ कर्ती व्यक्ती गमावणाऱ्या गरीब कुटुंबास बसत आहे. लॉकडाऊनमुळे त्यात अधिकच भर पडली आहे. आधीच दुःखाचा डोंगर आणि घरात लहान मुले असतील तर त्यांना काय खाऊ घालायचे, घरखर्च, घरभाडे आदी खर्च लॉकडाऊन संपेपर्यंत कसा भागवायचा, हा मोठा प्रश्न काही गरजू कुटुंबासमोर उभा आहे. ही गरज ओळखून युवान संस्थेमार्फत गिव्ह इंडियाच्या सहयोगातून अशा वंचित आणि गरजू कुटुंबांना तातडीचा म्हणून आधार देण्यात येणार आहे. त्यासाठी कोरोनामुळे व्यक्ती गमावणाऱ्या गरजू कुटुंबांनी युवान प्रतिनिधींशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गरजू, वंचित कुटुंबांच्या माहितीची ‘युवान स्वयंसेवकांमार्फत’ योग्य ती खातरजमा केली जाणार आहे. त्यामुळे सधन कुटुंबांची माहिती पाठवू नये, असे आवाहन युवानच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोनामुळे आई-वडील गमावणाऱ्या मुला-मुलींच्या शिक्षणाचीही जबाबदारीही युवान पुढील काळात लोकसहभागातून स्वीकारणार आहे. परंतु हा भार पेलवण्यासाठी समाजातील दानशूरांनीही पुढे यावे, असे आवाहन युवानचे संस्थापक संदीप कुसळकर यांनी केले आहे.