कोरोना उपचार केंद्र सुरू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:21 AM2021-04-09T04:21:10+5:302021-04-09T04:21:10+5:30
शहरातील नागरिकांसाठी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात नगराध्यक्ष आदिक यांनी पालिकेत बैठक आयोजित केली होती. यावेळी मुख्याधिकारी गणेश ...
शहरातील नागरिकांसाठी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात नगराध्यक्ष आदिक यांनी पालिकेत बैठक आयोजित केली होती. यावेळी मुख्याधिकारी गणेश शिंदे, राम टेकावडे, नगरसेवक राजेंद्र पवार, बाळासाहेब गांगड, रईस जहागिरदार, भाऊसाहेब डोळस, चंपालाल पोफळे, अनिल पांडे, डॉ. सचिन पऱ्हे आदी उपस्थित होते.
सध्या ग्रामीण रुग्णालयात मोफत लसीकरण सुरू आहे. हे रुग्णालय शहरापासून लांब असल्याने नागरिकांना जाण्या-येण्यासाठी गैरसोय होते. त्यामुळे पालिकेने शहरात लसीकरणाची सुविधा सुरू करावी, अशी मागणी वारंवार केली जात होती. पोफळे यांनी सोशल क्लब याठिकाणी लसीकरणाची सुविधा सुरू करावी, अशी सूचना केली. नगरसेवक पवार यांनी पालिकेच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी मंगल कार्यालयाचा पर्याय सुचविला. दोन्ही पैकी एक जागा निश्चित करून लसीकरणाची सुविधा सुरू करू, असे नगराध्यक्ष आदिक यांनी सांगितले. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून शहरात लसीकरणासाठी दोन डॉक्टर व चार आरोग्य सेविका उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली.
ग्रामीण रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून दिले जातील, असे सांगितले.
---------