कोपरगाव येथील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 10:16 AM2020-04-14T10:16:07+5:302020-04-14T10:16:17+5:30
अहमदनगर : कोपरगाव येथील कोरोनाबाधित महिला रुग्णाचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. त्यामुळे अहमदनगरमध्ये कोरोनाबाधित मृतांची संख्या दोन झाली आहे.
अहमदनगर : कोपरगाव येथील कोरोनाबाधित महिला रुग्णाचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. त्यामुळे अहमदनगरमध्ये कोरोनाबाधित मृतांची संख्या दोन झाली आहे.
दिनांक १० एप्रिल रोजी या महिलेचेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिला अहमदनगरमधील बूथ हॉस्पिटल येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. परंतु दोन दिवसात तिची प्रकृती खालावल्याने तिला पुन्हा उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. या महिलेला सर्दी, खोकला, तसेच श्वसनाचा त्रास अशी लक्षणे होती.
दरम्यान उपचार घेत असताना मंगळवारी (दि.१४) या महिलेचा मृत्यू झाला, अशी माहिती आहे. अहमदनगरमध्ये कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या २८ झाली असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी मागील आठवड्यात श्रीरामपूर येथील मतिमंद कोरोनाबाधित रुग्णाचा तरुणाचा मृत्यू झाला होता.