नगर जिल्ह्यात कोरोनातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.२५ टक्के; वीस हजाराहून अधिक रुग्ण घरी परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 12:57 PM2020-09-04T12:57:40+5:302020-09-04T12:58:52+5:30
जिल्ह्यात शुक्रवारी (४ सप्टेंबर) तब्बल ५४९ कोरोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे आतापर्यंत ब-या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २० हजार ५१० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.२५ टक्के इतके झाले आहे.
अहमदनगर : जिल्ह्यात शुक्रवारी (४ सप्टेंबर) तब्बल ५४९ कोरोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे आतापर्यंत ब-या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २० हजार ५१० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.२५ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजल्यापासून शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७० ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाºया रुग्णांची संख्या आता २ हजार ६५७ इतकी झाली आहे.
बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ११३, संगमनेर २, पाथर्डी ४, नगर ग्रामीण १२, श्रीरामपूर १, कँटोन्मेंट ३, श्रीगोंदा ११, पारनेर ३, शेवगाव १३, कोपरगाव ६, इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, २ हजार ६५७ रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत नगर जिल्ह्यात ३३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली.