शाळा सुरू झाल्याने कोरोनाच्या नेमणुका रद्द कराव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:28 AM2021-06-16T04:28:46+5:302021-06-16T04:28:46+5:30
यावेळी संघटनेचे सचिव आप्पासाहेब शिंदे, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे, भाऊसाहेब जिवडे, देवीदास पालवे, बद्रीनाथ शिंदे, ...
यावेळी संघटनेचे सचिव आप्पासाहेब शिंदे, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे, भाऊसाहेब जिवडे, देवीदास पालवे, बद्रीनाथ शिंदे, संपत ढोकणे, एफ. एम. शेख, आर. एन. घोडके, पी. एफ. कार्ले, पी. डी. कडूस, ई. व्ही. बारगजे, बी. डी. धाडगे आदी उपस्थित होते. माध्यमिक शाळांचे ऑनलाइन अध्यापनाचे काम सध्या सुरू झाले आहे. तरीदेखील शिक्षकांना कोरोनाच्या नेमणुका देण्यात आलेल्या आहेत. एकाच वेळी दोन ठिकाणी शिक्षकांना काम करणे अशक्य आहे. कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकांना कोरोनाची बाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीमध्ये मयत झालेल्या शिक्षकांचे संसार उघड्यावर आले असून, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनला आहे, तसेच माध्यमिक शिक्षकांचे पगार अनियमित होत असल्याने कोरोनाच्या संकटकाळात आर्थिक प्रश्न बिकट बनला आहे. कर्जाचे व इतर हप्ते वेळेवर न गेल्याने दंडाचा भुर्दंड बसत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. शिक्षकांच्या शाळा सुरू झाल्या असून, त्यांना कोरोनाच्या कामानिमित्त देण्यात आलेल्या नेमणुका रद्द कराव्यात, कोरोनाने मयत झालेल्या शिक्षकांच्या वारसांना अनुकंपाखाली नोकरी द्यावी व माध्यमिक शिक्षकांचे पगार प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आली.
----------------
फोटो - १५शिक्षक निवेदन
शिक्षकांच्या शाळा सुरू झाल्या असून, त्यांना कोरोनाच्या कामानिमित्त देण्यात आलेल्या नेमणुका रद्द कराव्यात, यासह इतर मागण्यांचे निवेदन माध्यमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांना दिले.