जिल्हा रुग्णालयात रुग्णाशेजारीच ठेवला कोरोनाबाधिताचा मृतदेह, रुग्णालयाला अस्वच्छतेने घेरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 12:47 PM2020-07-20T12:47:45+5:302020-07-20T12:51:12+5:30
अहमदनगर : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरू असताना कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णाच्या मृतदेहाची पाच तास उलटूनही विल्हेवाट लावली गेली नसल्याचा धक्कायदायक प्रकार रविवारी (दि़१९) दुपारी १२़३० वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात उघडकीस आला़ विशेष म्हणजे हा मृतदेह चार तास दुसºया एका रुग्णाशेजारीच केवळ चादरीने झाकून ठेवला होता़ यावर आक्षेप घेतल्यानंतर हा मृतदेह प्लॅस्टिक कव्हरने झाकण्यात आला़.

येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकाने संबंधित घटनेचे संपूर्ण व्हिडिओ चित्रण करुन ‘लोकमत’कडे पाठविले आहे़ हा व्हिडिओ रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान काढण्यात आलेला आहे़ नगर शहरातील एक महिला रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे़ या महिला रुग्णाशेजारीच संबंधित कोरोनाबाधिताचा मृतदेह ठेवण्यात आला़.
यामुळे घाबरलेल्या महिलेने यावर आक्षेप घेतला तसेच आपल्या नातेवाईकांना याबाबत कळविले़ त्यानंतर नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले़ त्यांनी तो मृतदेह तेथून हलविण्याची विनंती केली़ मात्र त्यांना कोणीही दाद दिली नाही़ कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह स्ट्रेचरवर एका चादरीखाली झाकून ठेवला होता़ त्यामुळे संबंधित नातेवाईकाने अतिदक्षता विभागातील या विदारक परिस्थितीचे व्हिडिओ चित्रण काढण्यास सुरुवात केली़ हे व्हिडिओ चित्रण सुरु केल्यानंतर त्यावर तेथील कर्मचाºयांनी आक्षेप घेतला़ व त्यानंतर संबंधित मृतदेह प्लॅस्टिकमध्ये बंद केला़
जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दुसºया रुग्णाशेजारीच कोरोनाबाधिताचा मृतदेह चादरीने झाकून ठेवण्यात आला होता़ पेशंटच्या नातेवाईकाने चित्रिकरण करुन अतिदक्षता विभागातील अव्यवस्था दाखविली़ अतिदक्षता विभागाच्या प्रवेशव्दारावर केळीचे सालपट, हातमोजे उघड्यावर पडलेले दिसतात़ तसेच कोरोना रुग्णांवर उपचार करताना वापरले जाणारे पीपीई किट एका बकेटमध्ये कोंबलेले आहेत़ बकेटच्या आजूबाजूला हातमोजे पडलेले पहायला मिळतात़.