शेवगाव पंचायत समितीमध्ये कोरोनाची इन्ट्री, शाखा अभियंत्याचा अहवाल पॉझिटिव्ह.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 07:22 PM2020-06-10T19:22:54+5:302020-06-10T19:24:26+5:30
शेवगाव : येथील पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या शाखा अभियंत्यास शारीरिक त्रास होऊ लागल्याने 'त्यांनी' औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात तपासणी केली असता कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पंचायत समितीत कोरोनाने शिरकाव केल्याचे कळताच तालुक्यात खळबळ उडाली आहे.
शेवगाव : येथील पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या शाखा अभियंत्यास शारीरिक त्रास होऊ लागल्याने 'त्यांनी' औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात तपासणी केली असता कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पंचायत समितीत कोरोनाने शिरकाव केल्याचे कळताच तालुक्यात खळबळ उडाली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी यांनी त्या अभियंताचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे. तो अधिकारी नेवासा येथून कार्यालयात कामकाज करण्यासाठी येऊन-करत होता, अशी प्राथमिक माहिती आरोग्य विभागाला मिळाली आहे. तर काही सहकारी कर्मचारी वर्गाने संबंधित अधिकारी काही दिवसापासून शेवगाव येथे भाड्याने खोली घेऊन राहत होते, अशी माहिती समोर येत आहे. ‘ते’अधिकारी औरंगाबाद येथे उपचार घेत असल्याने अधिक माहिती आरोग्य विभाग व नगर परिषदकडे उपलब्ध झाली नाही. दरम्यान नगर परिषद मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांना तहसीलदार अर्चना पागिरे यांनी तात्काळ पंचायत समितीची ईमारत निजंर्तुक करण्यास सांगितले आहे. सदर ईमारत निर्जंतुकीकरण केल्यानंतर दैनंदिन कामकाज सुरु होईल, असे गर्कळ यांनी म्हटले आहे. तो पर्यंत ईमारतीचा अधार्भाग सील राहणार आहे.
दरम्यान त्या अधिकाºयाच्या संपर्कात आलेल्या नऊ जणांना अहमदनगर येथे तपासणी करिता तत्काळ पाठवण्यात आले आहे. त्यात तालुका गट विकास अधिकारी यांचाही समावेश आहे. पंचायत समितीत दररोज कामानिमित्ताने आलेल्या नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. त्यामुळे कामानिमित्ताने कार्यालयात येऊन गेलेल्या नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
--