कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:19 AM2021-01-04T04:19:21+5:302021-01-04T04:19:21+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला आहे. जिल्ह्यात रोज १०० ते १५० जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह यायचा. सध्या ही ...
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला आहे. जिल्ह्यात रोज १०० ते १५० जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह यायचा. सध्या ही संख्या शंभराच्या खाली आली आहे. रविवारी जिल्ह्यात फक्त ८८ जणांनाच कोरोनाची बाधा झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
जिल्ह्यात रविवारी ७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार ३०१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०१ टक्के इतके झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने सध्या १ हजार २६ जणांवरच उपचार सुरू आहेत.
रविवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४८ आणि अँटिजन चाचणीत ११ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये नगर शहर (१२), नगर ग्रामीण (११), संगमनेर (२५), शेवगाव (५), अकोले (२), जामखेड (१), कोपरगाव (७), नेवासा (९), पारनेर (१४), पाथर्डी (३), राहाता (४), श्रीगोंदा (२), श्रीरामपूर (१), कर्जत (१), जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ६९ हजार ३७५ इतकी झाली असून मृत्यू झालेल्यांची संख्या १ हजार ४८ इतकी आहे.