कोरोनाचे रुग्ण घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:21 AM2021-02-10T04:21:29+5:302021-02-10T04:21:29+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे आकडेवारीवरून दिसते आहे. दररोज सरासरी शंभर जणांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येतो. ...
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे आकडेवारीवरून दिसते आहे. दररोज सरासरी शंभर जणांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येतो. मंगळवारी मात्र ६९ जणांचाच कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बरे होण्याचा दरही दुप्पट असून १२८ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या १ हजार ३२ जणांवरच उपचार सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने पत्रकात म्हटले आहे. मंगळवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २६, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १३ आणि अँटीजेन चाचणीत ३० रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये नगर शहर (१६), नगर ग्रामीण (१०), राहाता (८), संगमनेर (६), शेवगाव (१), श्रीगोंदा (८), पारनेर (१), श्रीरामपूर (५), अकोले (२), कोपरगाव (१), नेवासा (२), पाथर्डी (१), राहुरी (३), कन्टोन्मेंट (५) येथील रुग्णांचा समावेश आहे. नगर शहरातही सर्वाधिक ५० ते ६० रुग्ण आढळून येत आहेत. मात्र मंगळवारी फक्त १६ जण पॉझिटिव्ह आल्याने नगरमधील संख्या घटली आहे.