एका दिवसातील कोरोनाचे रेकॉर्ड ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:22 AM2021-04-01T04:22:26+5:302021-04-01T04:22:26+5:30

अहमदनगर: कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून नगर जिल्ह्यात प्रथमच एकाच दिवसात सर्वात जास्त रुग्ण येण्याचे बुधवारी रेकॉर्ड संपुष्टात आले. ...

Corona's record break in one day | एका दिवसातील कोरोनाचे रेकॉर्ड ब्रेक

एका दिवसातील कोरोनाचे रेकॉर्ड ब्रेक

अहमदनगर: कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून नगर जिल्ह्यात प्रथमच एकाच दिवसात सर्वात जास्त रुग्ण येण्याचे बुधवारी रेकॉर्ड संपुष्टात आले. सप्टेंबर-२०२० मध्ये एकाच दिवशी १६१८ रुग्ण बाधित झाले होेते. बुधवारी एकाच दिवसात १६८० रुग्ण बाधित झाल्याने पूर्वीचे रेकॉर्ड मोडले असून कोरोनाने चिंता वाढवली आहे. बुधवारी दुपारी संपलेल्या २४ तासात १३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात बुधवारी १ हजार ३३८ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८६ हजार ९९० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.६४ टक्के इतके झाले आहे. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६ हजार ७१४ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६७७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५१४ आणि अँटिजेन चाचणीत ४८९ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये नगर शहर (४३३), राहाता (२२९), श्रीरामपूर (११६), कोपरगाव (११४), संगमनेर (१०५), कर्जत (१०१), राहुरी (९२), नगर ग्रामीण (७४), पाथर्डी (६३), अकोले (६१), शेवगाव (६१), पारनेर (६०), नेवासा (५५), जामखेड (३७), श्रीगोंदा (३७), भिंगार (१६), मिलिटरी हॉस्पिटल (१४), परजिल्हा (१२) अशा १६८० रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान एकाच दिवशी १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली. जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने सरकारी रुग्णालयातील बेड आता कमी पडत असल्याने सर्व जिल्हाभरात कोविड सेंटर कार्यान्वित करण्याचा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आदेश दिला आहे.

-------------

कोरोनाची स्थिती

बरे झालेली रुग्ण संख्या : ८६९९०

उपचार सुरू असलेले रूग्ण : ६७१४

मृत्यू : १२१८

एकूण रूग्ण संख्या : ९४९२२

-----

Web Title: Corona's record break in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.