कोरोनाचा रिपोर्ट आता दोन तासात; प्रवरा आरोग्य विद्यापीठाच्या लॅबला मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 04:58 PM2020-05-08T16:58:00+5:302020-05-08T16:59:08+5:30
प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या कोरोना टेस्ट लॅबला राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या टेस्टसाठी पुण्याला जाण्याची गरज पडणार नाही. लॅबमुळे वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. राज्य शासनाची मान्यता असलेली ही जिह्यातील पहिलीच टेस्ट लॅब असल्याची माहिती विद्यापीठाचे उपकुलपती डॉ.राजेंद्र विखे यांनी दिली.
लोणी : प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या कोरोना टेस्ट लॅबला राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या टेस्टसाठी पुण्याला जाण्याची गरज पडणार नाही. लॅबमुळे वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. राज्य शासनाची मान्यता असलेली ही जिह्यातील पहिलीच टेस्ट लॅब असल्याची माहिती विद्यापीठाचे उपकुलपती डॉ.राजेंद्र विखे यांनी दिली.
विद्यापीठाच्या मॉयक्रोबॉलोजी विभागाला कोरोना तंत्रज्ञानाला नॅशनल अॅक्रिरेडेशन बोर्ड फॉर लॅबरोटरीचे सर्टिफीकेशन व राज्य सरकारची परवानगी मिळाल्यानंतर शुक्रवारी पत्रकार परिषदेत डॉ.विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी कुलगुरु डॉ.वाय.एम.जयराज, मेडीकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ.राजवीर भलवार, मॉयक्रोबॉयलोजी विभागप्रमुख डॉ.शरीयार रोशनी, डॉ. रवींद्र कारले उपस्थित होते.
मॉयक्रोबायोलॉजी विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमी कालावधीत ट्रनॅट मशिन व आरटीपीसीआर तंत्रज्ञान स्वीकारले. त्यासाठी नॅशनल अॅक्रीरेडेशन बोर्ड फॉर लॅबरोटरी यांचे सर्टिफीकेशन मिळवले. त्यानंतर कोरोनाच्या टेस्टसाठी लॅबला राज्य शासनाची परवानगी मिळाली आहे. कोरोनाच्या रिपोर्टसाठी आता दोन दिवस थांबण्याची गरज पडणार नाही. हे रिपोर्ट फक्त दोन तासात उपलब्ध होतील. लॅबमध्ये शासनाकडून आलेल्या कोरोना संशयित रुग्णाच्या स्वॅबची मोफत तपासणी केली जाणार आहे, असेही डॉ. विखे यांनी सांगितले.
कुलगुरु डॉ. वाय. एम. जयराज म्हणाले, विद्यापीठाने संकट काळात सहा दिवसात कोविड-१९ साठी १०० बेडचे अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय उभारले आहे. आता नवी अत्याधुनिक लॅब सुरु केली आहे. यामुळे कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे.
दोन तासाला चार टेस्ट
लॅबच्या माध्यमातून दोन तासाला चार टेस्ट होतील. हे तंत्रज्ञान पूर्णपणे सुरक्षीत असून लॅबच्या टीमला प्रक्षिक्षण देण्यात आले असल्याचे मॉयक्रोबॉयोलोजी विभागप्रमुख डॉ.शरियार रोशनी यांनी सांगितले.