श्रीरामपूर तालुक्यात विलगीकरण कक्षातील व्यक्ती कोरोनाबाधित; सलग दुस-या दिवशी मिळाला रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 12:59 PM2020-05-25T12:59:36+5:302020-05-25T13:00:02+5:30
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील आश्रमातील एक व्यक्ती रविवारी कोरोना बाधित आढळून आल्यानंतर सोमवारी सकाळी मुंबईहून आलेला व विलगीकरण कक्षात असलेला एक व्यक्ती पॉझिटिव्ह मिळून आला. शुक्रवारी तब्येत खराब झाल्याने त्यास नगर येथील सिव्हिल रुग्णालयात तपासणीसाठी हलविण्यात आले होते.
श्रीरामपूर : तालुक्यातील वडाळा महादेव येथील आश्रमातील एक व्यक्ती रविवारी कोरोना बाधित आढळून आल्यानंतर सोमवारी सकाळी मुंबईहून आलेला व विलगीकरण कक्षात असलेला एक व्यक्ती पॉझिटिव्ह मिळून आला. शुक्रवारी तब्येत खराब झाल्याने त्यास नगर येथील सिव्हिल रुग्णालयात तपासणीसाठी हलविण्यात आले होते.
मुंबई, पुणे, औरंगाबाद व इतर रेड झोनमधील २० हून अधिक नागरिकांना वडाळा महादेव येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. सोमवारी कोरोना संक्रमित आलेला मुंबई येथून आलेला आहे. त्याच्यासह कुटुंबातील दोन सदस्यांना तपासणीसाठी नगरला पाठविले जाणार आहे.
दरम्यान, औरंगाबाद येथील एक महाराज वडाळा महादेव येथील आश्रमात स्थानिक दक्षता समिती अथवा प्रशासनाला कुठलीही खबर न देता वास्तव्य करीत होता. २० मे रोजी तो आश्रमात आला. मात्र त्याची कुणालाही खबर नव्हती. श्रीरामपूर तालुक्यात सहाशेहून अधिक लोक मुंबई, पुणे, नाशिक तसेच राज्याबाहेरून दाखल झाले आहेत. यातील निम्मे लोक विना परवानगी आल्याची माहिती गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांनी दिली. त्यामुळे ग्रामीण भागावर मोठा ताण आला आहे.