संगमनेर शहरातील दोघांना कोरोनाची लागण, जिल्हाधिकारी संगमनेरची करणार पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 11:40 AM2020-06-25T11:40:58+5:302020-06-25T11:41:07+5:30
संगमनेर : शहरातील मोमीनपुरा येथील ४६ वर्षीय पुरूष व नाईकवाडपुरा येथील ५० वर्षीय महिला अशा दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. गुरूवारी (२५ जून) त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

जिल्ह्याची कोरोनाची आकडेवाडी पाहिली असता सर्वाधिक रूग्ण हे संगमनेर तालुक्यात आढळून आले आहेत. कोरोनामुळे सर्वाधिक दहा जणांचे मृत्यू याच तालुक्यात झाले आहेत. गुरूवारी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण ९९ झाली आहे. दररोज कोरोनाचे रूग्ण सापडत असल्याने शहराबरोबरच ग्रामीण भागातही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.