CoronaVirus News: मास्क न वापरल्यानं आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 23:30 IST2020-06-13T23:29:20+5:302020-06-13T23:30:40+5:30
सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

CoronaVirus News: मास्क न वापरल्यानं आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल
अहमदनगर: बाहेर फिरताना चेहऱ्याला मस्क न लावल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह 25 जणांविरोधात शनिवारी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगताप यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्ते जगताप यांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्र जमले होते. बाहेर फिरताना व शुभेच्छा स्वीकारत असताना जगताप यांनी मास्क लावला नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जगताप यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत एका पोलीस कर्मचाऱ्याने फिर्याद दाखल केली आहे.