CoronaVirus News: कोरोना रुग्णाचा हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 11:12 AM2020-08-25T11:12:13+5:302020-08-25T11:13:26+5:30

CoronaVirus News: कोरोना रुग्ण गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

CoronaVirus Corona patient attempts suicide by jumping from third floor of Hospital in Ahmednagar | CoronaVirus News: कोरोना रुग्णाचा हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

CoronaVirus News: कोरोना रुग्णाचा हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर: नगर शहरातील गुलमोहर रोडवरील सुरभी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका कोरोना बाधित रुग्णाने हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. 

तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने सदर रुग्णाला जबर मार लागला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर सुरभी हॉस्पिटलमध्येच उपचार सुरू आहेत. सदर 32 वर्षीय रुग्ण हा पाथर्डी तालुक्यातील आहे. त्याच्यावर मागील दहा दिवसांपासून शिरूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. सोमवारी रात्री तो सुरभी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झाला होता. पहाटे सव्वातीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास त्याने पळत येऊन हॉस्पिटलची काच तोडून थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. ही घटना निदर्शनास येताच हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तत्काळ त्याच्यावर उपचार सुरू केले.
 

Web Title: CoronaVirus Corona patient attempts suicide by jumping from third floor of Hospital in Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.