coronavirus: शिर्डीमध्ये यंदा प्रथमच भक्तांविना साजरी झाली गुरुपौर्णिमा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 05:35 AM2020-07-06T05:35:32+5:302020-07-06T05:35:47+5:30
शिर्डीत रविवारी पहाटे काकड आरतीनंतर साईप्रतिमा व ग्रंथाची द्वारकामाई मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली़ गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने साईसंस्थानने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात २१० व्यक्तींनी रक्तदान करून बाबांना आगळीवेगळी गुरूदक्षिणा दिली़
शिर्डी : साईबाबांच्या हयातीत सुरू झालेला व तब्बल १११ वर्षांची परंपरा लाभलेला साईनगरीतील गुरूपौर्णिमा उत्सव यंदा प्रथमच भक्तांविना साजरा झाला. कोरोनाचे संकट टळू दे, लवकर मंदिर उघडून तुझ्या चरणाचे दर्शन होऊ दे, असे साकडे घालत ग्रामस्थांनी दुरूनच साईमंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले़
शिर्डीत रविवारी पहाटे काकड आरतीनंतर साईप्रतिमा व ग्रंथाची द्वारकामाई मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली़ गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने साईसंस्थानने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात २१० व्यक्तींनी रक्तदान करून बाबांना आगळीवेगळी गुरूदक्षिणा दिली़ नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील गुरुपौर्णिमाही प्रथमच भक्तांविना साजरी झाली़
अक्कलकोटमध्ये परंपरा खंडित
अक्कलकोटच्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेस दरवर्षी हजारो स्वामीभक्त भेटीसाठी येतात़ स्वामींनाच गुरु मानणाऱ्या भाविकांना दर्शनास मुकावे लागले.
पंढरीऐवजी अलंकापुरीत काला
तीर्थक्षेत्र आळंदीत माऊलींच्या चलपादुकांची टाळ-मृदंगाच्या गजरात व ज्ञानोबा - माऊली - तुकारामांच्या जयघोषात काल्याचा सोहळा करण्यात आला.