Coronavirus : मोची गल्ली व्यापारी असोसिएशनचा मिनी लॉकडाऊनला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 02:42 PM2021-04-06T14:42:30+5:302021-04-06T14:43:09+5:30

मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने राज्य सरकारने केलेल्या मिनी लॉकडाऊनला मंगळवारी बंद दुकान समोर उभे राहून व्यापारी व कामगारांनी विरोध दर्शविला. तर या निर्णयाचा निषेध नोंदवून सोमवार ते शुक्रवार सर्व नियमांचे पालन करुन व्यवसाय करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली.

Coronavirus : Mochi Street Traders Association opposes mini lockdown | Coronavirus : मोची गल्ली व्यापारी असोसिएशनचा मिनी लॉकडाऊनला विरोध

Coronavirus : मोची गल्ली व्यापारी असोसिएशनचा मिनी लॉकडाऊनला विरोध

अहमदनगर - मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने राज्य सरकारने केलेल्या मिनी लॉकडाऊनला मंगळवारी बंद दुकान समोर उभे राहून व्यापारी व कामगारांनी विरोध दर्शविला. तर या निर्णयाचा निषेध नोंदवून सोमवार ते शुक्रवार सर्व नियमांचे पालन करुन व्यवसाय करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मोची गल्लीतील दुकान मालक व कामगार फिजीकल डिस्टन्ससह नियमांचे पालन करुन उपस्थित होते.

मागील वर्षी झालेल्या टाळेबंदीमुळे व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. हळहळू अर्थचक्र रुळावर येत असताना पुन्हा मिनी लॉकडाऊनच्या नावाखाली लॉकडाऊनच करण्यात आले आहे. शहरातील कापड बाजार, मोची गल्ली ही मुख्य बाजारपेठ आहे. यामध्ये विविध दुकाने असून, हजारो कामगार आपला उदरनिर्वाह करीत आहे. राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तू वगळून सर्व  दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे इतर दुकानातील व्यापार्‍यांचा दिवाळा निघणार आहे. तर या दुकानात काम करणारे हजारो कामगारांचा रोजगार हिरावला जाणार आहे. कोरोनाची साखळी बाजारपेठा बंद करुन तुटणार आहे का? हा प्रश्‍न उपस्थित करुन यामुळे मोठ्या प्रमाणात अर्थचक्र बिघडणार असल्याची प्रतिक्रिया व्यावसायिकांनी व्यक्त केली. तर सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7 वाजे पर्यंत व्यापार्‍यांना नियमांचे पालन करुन आपला व्यवसाय करु देण्याची मागणी करण्यात आली आहे. शनिवार व रविवारच्या टाळेबंदीत व्यापारी स्वत:हून बंद ठेवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Web Title: Coronavirus : Mochi Street Traders Association opposes mini lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.