Coronavirus : दिलासादायक : जिल्ह्यातील ५६ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह; २२ अहवालाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 06:36 PM2020-04-15T18:36:44+5:302020-04-15T18:37:19+5:30
जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यापैकी ५६ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
अहमदनगर : जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यापैकी ५६ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. नेवासा येथील २४, श्रीरामपूर येथील ११, नगर शहरातील ६, राहत्यामधील ३, पाथर्डी तालुक्यातील २, राहुरीतील २, कोपरगाव येथील ४ तर अकोले, संगमनेर, कर्जत येथील प्रत्येकी एका व्यक्तीचे चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. कोरोनाबाधित फ्रान्स येथील परदेशी नागरिकाचा १४ दिवसानंतरचा दुसरा अहवालही निगेटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.