दिलासादायक : नगरमधील तिसऱ्या कोरोनाबाधित रुग्णाचा १४ दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 18:56 IST2020-04-09T18:55:31+5:302020-04-09T18:56:26+5:30
जिल्ह्यातील तिस-या कोरोनाबाधित रुग्णाचा १४ दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

दिलासादायक : नगरमधील तिसऱ्या कोरोनाबाधित रुग्णाचा १४ दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह
अहमदनगर : जिल्ह्यातील तिस-या कोरोनाबाधित रुग्णाचा १४ दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आज हा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला. यापुर्वी दोन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तिस-या रुग्णाच्या अजून एका अहवालाची प्रतीक्षा आहे. तो अहवाल निगेटीव्ह आल्यास उद्या त्या रुग्णाल घरी सोडण्यात येणार आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे आतापर्यंत १२२ व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने पाठविले आहेत. या अहवालांची प्रतीक्षा असून यामध्ये तिसऱ्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या १४ दिवसानंतरच्या दुसऱ्या अहवालाचा समावेश असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितलं.