कोरोनाच्या संशयितांची सोशल मीडियावर नावे उघड केल्याने मनसेच्या शॅडोमंत्र्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 11:26 AM2020-03-19T11:26:52+5:302020-03-19T11:56:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोनाच्या संशयितांची नावे सोशल मीडियावर उघड केल्याने व तशा पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी शहरातील एक गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात, तर दुसरा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पहिला गुन्हा पुणे येथील मनसेचे पदाधिकारी व शॅडो मंत्रीमंडळातील कृषी व दुग्धविकास मंत्री संदीव पाखरे (रा. लोकमान्य हाऊस, पौंड रोड, रामकृष्ण परमहंस नगर, कोथरुड, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Coroner's suspects open names on social media | कोरोनाच्या संशयितांची सोशल मीडियावर नावे उघड केल्याने मनसेच्या शॅडोमंत्र्यावर गुन्हा दाखल

कोरोनाच्या संशयितांची सोशल मीडियावर नावे उघड केल्याने मनसेच्या शॅडोमंत्र्यावर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोरोनाच्या संशयितांची नावे सोशल मीडियावर उघड केल्याने व तशा पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी शहरातील एक गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात, तर दुसरा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पहिला गुन्हा पुणे येथील मनसेचे पदाधिकारी व शॅडो मंत्रीमंडळातील कृषी व दुग्धविकास मंत्री संदीव पाखरे (रा. लोकमान्य हाऊस, पौंड रोड, रामकृष्ण परमहंस नगर, कोथरुड, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
कोरोना विषाणूचे रुग्ण व तपासणी केंद्राची माहिती सोशल मीडियात व्हायरल केली होती.  पहिला गुन्हा नगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाचे कैलास काशिनाथ शिंदे यांनी फिर्याद दाखल केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष संजीव पाखरे (रा. पौंड रोड, पुणे) यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे. पाखरे यांनी कोरोनाच्या संशयित रुग्णांची नावे सोशल मीडियावर व्हायरल केली आणि त्यांची ओळख उघड केली. गत आठवड्यात संशयित असलेल्यांपैकी तीन रुग्ण जिल्हा रुग्णालयाकून पळून गेले होते, या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाने तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचे पत्रच पाखरे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले होते.
दुसरा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. कोरोना व्हायरसची तपासणी केंद्र या मथळयाची पोस्ट एका ग्रुपवर टाकली. या प्रकरणी कोतवाली पोलिस तन्वीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्ट व्हायरल करणारे तेजस जीभकाटे, रवींद्र चौबे, सचिन राऊत (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या दोन्ही प्रकरणात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करण्यात आला आहे.
आपत्कालीन व्यवस्थापनाच्या आदेशाचे तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा चौघांवर गुन्हा दाखल झाला असून जिल्ह्यातील हा पहिलाच गुन्हा ठरला आहे.

Web Title: Coroner's suspects open names on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.