सेवेसाठी महामंडळ सज्ज; पण शेवगाव बसस्थानकात प्रवाशांच्या प्रतीेक्षेत लालपरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 12:44 PM2020-05-22T12:44:34+5:302020-05-22T12:46:35+5:30
लॉकडाऊनमधून सरकारने शिथीलता देतांना राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसेसला जिल्ह्यातर्गंत प्रवासी वाहतूक करण्यास मुभा दिली आहे. मंडळाने सर्व गाड्या सज्ज करताना सॅनिटाईझ करुन प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बसस्थानकात आणून उभ्या केल्या. मात्र प्रवाशांच्या प्रतीक्षेत बस स्थानकात उभ्या असल्याचे चित्र आहे.
शेवगाव : लॉकडाऊनमधून सरकारने शिथीलता देतांना राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसेसला जिल्ह्यातर्गंत प्रवासी वाहतूक करण्यास मुभा दिली आहे. मंडळाने सर्व गाड्या सज्ज करताना सॅनिटाईझ करुन प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बसस्थानकात आणून उभ्या केल्या. मात्र प्रवाशांच्या प्रतीक्षेत बस स्थानकात उभ्या असल्याचे चित्र आहे.
शुक्रवारी (२२ मे) सकाळी बसस्थानकात प्रवासी वर्गाअभावी शुकशुकाट पाहिला मिळत होता. निर्जंतुकीकरण केलेल्या बस अहमदनगर, श्रीरामपूरकडे जाणा-या प्रवाशाकरिता स्थानकात सज्ज होत्या. मात्र प्रवासी वर्ग बसस्थानकाकडे फिरकलाच नाही. त्यामुळे नियोजित फेºया रद्द कराव्या लागल्या. अहमदनगर व श्रीरामपूरकडे जाणा-या प्रवाशांच्या सेवेसाठी प्रत्येकी १२ फेºयांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र सकाळच्या सुमारास प्रवासासाठी कोणीच प्रवासी न आल्याने अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या चेह-यावर चिंतेचे भाव दिसून येत होते. प्रवासी वर्गाची सुरक्षितेची काळजी घेताना सर्व बस दुरुस्ती करीत चांगल्या प्रकारे धुवून घेत, निर्जंतुकीकरण करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या स्वागतासाठी महामंडळाचे प्रशासन सज्ज होते. आगारप्रमुख देवराज यांनी लॉकडाऊनपूर्वी शेवगाव आगारचा बस दररोज राज्यातील विविध भागात सर्व साधारणपणे २० हजार किलोमीटर फिरुन प्रवासी वाहतूक करीत होत्या.
मागील गत दोन महिन्यात शेवगाव आगाराला साडेतीन कोटींचे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिकांना व दहा वषार्खालील मुलांना प्रवास करता येणार नसल्याचे सांगितले. प्रवाश्यांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर असून त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व काळजी घेतली जाईल, असे शेवगावचे आगाराप्रमुख देवराज यांनी सांगितले.