मनपाचे ३२ सार्वजनिक शौचालये सर्वोत्कृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:22 AM2021-04-01T04:22:24+5:302021-04-01T04:22:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेचे शहरातील ३२ शौचालये सर्वोत्कृष्ट असल्याचा अहवाल समितीने दिला असून, स्वच्छ भारत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेचे शहरातील ३२ शौचालये सर्वोत्कृष्ट असल्याचा अहवाल समितीने दिला असून, स्वच्छ भारत अभियानात मानाचा ‘ओडीएफ प्लस’ मानांकन प्राप्त झाले आहे.
महापालिकेने स्वच्छ भारत अभियानामध्ये भाग घेतला असून, केंद्रीय पथकाने शहरातील शौचालयांना भेटी देऊन पाहणी केली. त्याचा अहवाल नुकताच संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षण २०२१ चे ओ.डी.एफ प्लस मानांकन मिळाले आहे. हे मानांकन महापालिकेला फाईव्ह स्टार मानांकन मिळण्यासाठी उपायुक्त ठरणार आहे.
सन २०२० मध्ये महापालिकेला ओ. डी. एफ प्लस मानांकन मिळाले होते. हे मानांकन मिळविण्यासाठी शहरातील ३२ सार्वजनिक शौचालयाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामधील ५ सार्वजनिक शौचालयाला सर्वोत्कृष्ट शौचालय म्हणून घोषित करण्यात आले होते. चालूवर्षी शहरातील ३२ सार्वजनिक शौचालयाची तपासणी करण्यात आली. ही सर्व शौचालये अति उत्कृष्ट दर्जाचे असल्याचा अहवाल पाहणी समितीने दिला आहे. हे मानांकन मिळाल्याबद्दल महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे यांनी घनकचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले असल्याची माहिती स्वच्छ संरक्षण कक्ष प्रमुख पी. एस. बीडकर यांनी दिली.