नगरसेवक ते केंद्रिय मंत्री, वाचा.. दिलीप गांधी यांचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 02:19 PM2021-03-17T14:19:25+5:302021-03-17T14:39:02+5:30
नगरसेवक पदापासून सुरु झालेल्या त्यांचा प्रवास दिल्लीतील केंद्रिय मंत्रीपदापर्यत पोहोचला.
अहमदनगर : भाजपचे माजी केंद्रिय मंत्री दिलीप गांधी यांचे आज पहाटे दिल्ली येथे निधन झाले. अहमदनगर येथून नगरसेवक पदापासून सुरु झालेल्या त्यांचा प्रवास दिल्लीतील केंद्रिय मंत्रीपदापर्यत पोहोचला. नगरसेवक, नगराध्यक्ष असा प्रवास सुरु असतानाच त्यांना १९९९ मध्ये खासदारकीची लॉटरी लागली. अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे ते पहिले खासदार झाले. त्यानंतर या मतदारसंघाचे त्यांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केले. मंत्रीपदाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात कार्यकर्ते जोडत कामाचा ठसा उमटवला.
- जीवनप्रवास आणि त्यांनी भुषवलेली विविध पदे-
नाव : दिलीप मनसुखलाल गांधी
जन्म दिनांक : ९ मे १९५१
जन्मस्थळ : दौंड, जिल्हा पुणे (महाराष्ट्र)
वडिलांचे नाव : मनसुखलाल श्रीमालजी गांधी
आईचे नाव : विमलबाई मनसुखलाल गांधी
पत्नीचे नाव : सरोज दिलीपकुमार गांधी
अपत्य- मुलगा : २ मुले, मुलगी-१
शैक्षणिक पात्रता : एस.एस.सी.
व्यवसाय : व्यापार, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ता
पत्ता : देवेंद्र बंगला, आचार्य आनंदऋषीजी मार्ग, अहमदनगर ४१४००१ महाराष्ट्र
- भूषविलेली पदे-
नगरसेवक, अहमदनगर नगरपालिका
गटनेता, अहमदनगर नगरपालिका, भारतीय जनता पार्टी
जिल्हा सरचिटणीस, भाजपा, अहमदनगर
जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा, अहमदनगर
उपनगराध्यक्ष, अहमदनगर नगरपालिका
अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी अहमदनगर शहर
संयुक्त सचिव, भारतीय जनता पार्टी, अहमदनगर
पहिल्यांदा खासदार, १३ वी लोकसभा,१९९९-२००४
सदस्य, सल्लागार समिती, ग्रामीण विकास मंत्रालय, २०००-२००४
सदस्य, सल्लागार समिती, वित्तमंत्रालय, २०००-२००३
केंद्रीय राज्यमंत्री, जहाज मंत्रालय, २९ जानेवारी २००३ ते १५ मार्च २००४
दुस-यांदा खासदार, १५वी लोकसभा सदस्य, २००९-२०१४,
सदस्य, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समिती, ३१ ऑगस्ट २००९
सदस्य, नागरी र्विमानन सल्लागार समिती
सदस्य, हौसिंग समिती, ९ जून २०१३
तिस-यांदा खासदार, १६वी लोकसभा सदस्य, २०१४-२०१९
अध्यक्ष, संसदीय अधिनस्थ समिती
सदस्य, संसदीय नगर विकास समिती
सदस्य, संसदीय वित्तीय समिती
सदस्य, संसदीय एम.पी.एल.ए.डी. समिती.
...........................
अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी
अध्यक्ष, जुनिअर कॉलेज भाईसथ्था हायस्कूल,
अध्यक्ष, चौपाटी हातगाडी संघटना, अहमदनगर
जिल्हाध्यक्ष, मोटार कामगार संघटना,
संचालक, अनुसूचित जमाती महामंडळ, अहमदनगर
संचालक,महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व विकास प्राधिकरण (म्हाडा)
संचालक, माजी अध्यक्ष- नगर अर्बन को- ऑप. बँक (मल्टी-स्टेट दर्जा ) अहमदनगर
कार्यकारी समिती सदस्य : हिंद सेवा मंडळ व शिशुसंगोपन संस्था
सदस्य : (१) जिल्हा शांतता समिती (२) अहमदनगर नगरपालिका शिक्षण मंडळ समिती (३) जिल्हानियोजन व विकास समिती (४) दूरध्वनी समिती (५) राष्ट्रीय तेल बिया आणि वनस्पती तेल बिया विकास महामंडळ