चिचोंडी पाटील येथे प्रेमी युगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 02:38 PM2019-06-05T14:38:29+5:302019-06-05T14:46:06+5:30
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील परिसरात बंद पडलेल्या हॉटेलमध्ये प्रेमी युगुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
चिचोंडी पाटील - नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील परिसरात बंद पडलेल्या हॉटेलमध्ये प्रेमी युगुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यात तरुणीचा मृत्यू झाला तर तरुणाची प्रकृती गंभीर आहे. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अवंतिका रघुनाथ दळवी (वय 19) असे मृत तरुणीचे नाव आहे तर मुकुंद शंकर भोजने (वय 23)असे त्या तरुणाचं नाव आहे. हे प्रेमी युगल कडा येथील राहणारे आहे. ते सकाळी 11 वाजेच्या सुमारास चिचोंडी पाटील रोडवरील बंद पडलेल्या हॉटेल येथे आले होते. त्या हॉटेलमध्ये दोघांनी घरून आणलेल्या डब्यात जेवण केले.
जेवण केल्यानंतर हॉटेलच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब परिसरातील ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलीस पाटलांना माहिती दिली. पोलीस पाटील यांनी पोलिसांना कळविल्यानंतर नगर तालुक्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सदर मुलीचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा अत्यवस्थ आहे. त्याच्यावर नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नगर तालुक्याचे पोलीस पुढील तपास करत आहेत.