उद्योग, व्यवसायात धाडस महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:23 AM2021-09-23T04:23:56+5:302021-09-23T04:23:56+5:30
ढवळगाव : उद्योग, व्यवसाय यशस्वी करण्यासाठी शिक्षण नव्हे तर धाडस महत्त्वाचे आहे. शिक्षणाचा सन्मान करण्यासाठी बचतगटांचा ...
ढवळगाव : उद्योग, व्यवसाय यशस्वी करण्यासाठी शिक्षण नव्हे तर धाडस महत्त्वाचे आहे. शिक्षणाचा सन्मान करण्यासाठी बचतगटांचा वापर करावा. ग्रामीण भागातील महिलांकडे जिद्द व चिकाटी असते. त्यामुळे त्याही उद्योग, व्यवसायात यश मिळवू शकतात, असे मत कृषिप्रक्रिया नियोजनचे संचालक सुभाष नागरे यांनी व्यक्त केले.
श्रीगोंदा तालुक्यातील पिंपरी चौफुला येथे महिला बचतगटांच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विभागीय कृषी महासंचालक बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, कृषी उपसंचालक राजाराम गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी अनिल गवळी, पं. स. सदस्य कल्याणी लोखंडे, डॉ. प्रिया माने आदी उपस्थित होते.
यशस्वी उद्योजक म्हणून अतुल लोखंडे, मंदाकिनी दिघे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कृषी तालुकाध्यक्ष राजाराम गायकवाड, दीपक सुपेकर, आबासाहेब भोरे, दिलावर शेख आदींसह श्रीगोंदा कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.
शीतल शिर्के, नवनाथ शिंदे, सुरेखा शिर्के, प्रगती बनकर, डॉ. समाधान खुपसे आदींनी मनोगत व्यक्त केले. ए. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. रावसाहेब चक्रे यांनी सूत्रसंचालन केले. सुवर्णा वाघमारे यांनी आभार मानले.