अकोले तालुक्यात चुलता-पुतण्याचा शेततळ््यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 06:43 PM2020-05-17T18:43:11+5:302020-05-17T18:43:20+5:30
अकोले : तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे वडगाव रोड शिवारात शेततळ्यात बुडून चुलता- पुतण्याचा मृत्यू झाला. कार्तिक सुनील गोर्डे (वय २०) आणि अनिल खंडू गोर्डे (वय ४५) अशी मृतांची नावे आहेत.
अकोले : तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे वडगाव रोड शिवारात शेततळ्यात बुडून चुलता- पुतण्याचा मृत्यू झाला. कार्तिक सुनील गोर्डे (वय २०) आणि अनिल खंडू गोर्डे (वय ४५) अशी मृतांची नावे आहेत.
रविवारी (दि.१७) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव निपाणी- वडगाव लांडगा रोडवर भीमाशंकर गोर्डे यांच्या शेततळ्यात कार्तिक गोर्डे पोहण्यासाठी गेला होता. तो पाण्यात बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी चुलते अनिल गोर्डे यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र शेततळ्याच्या प्लॅस्टिक कागदामुळे त्यांनाही बाहेर येता आले नाही. दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यानंतर घरातील लोकांनी शेततळे फोडून त्यांना बाहेर काढले. अकोले ग्रामीण रुग्णालयात दोघांनाही दाखल करण्यात आले आहे. कार्तिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता.