नगरच्या जिल्हा रुग्णालयात होणार आता कोविड चाचणी, अत्याधुनिक लॅबचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 03:26 PM2020-05-21T15:26:36+5:302020-05-21T15:33:09+5:30
अहमदनगर : अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या कोविड चाचणी करण्यासाठीची अत्याधुनिक लॅब नगर येथील जिल्हा रुग्णालयात सुरू झाली आहे.
अहमदनगर : अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या कोविड चाचणी करण्यासाठीची अत्याधुनिक लॅब नगर येथील जिल्हा रुग्णालयात सुरू झाली आहे. संशयितांच्या लाळेचे नुमने आता पुणे येथे पाठवावे लागणार नाहीत. शुक्रवारपासून या लॅबमध्ये तपासणी सुरू होणार असल्यामुळे पुणे येथून अहवालाची प्रतिक्षा करण्याची गरज लागणार नाही.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा रुग्णालय येथे गुरुवारी ‘कोविड -१९’ या अत्याधुनिक लॅबचा शुभारंभ केला. यावेळी जिल्हाधिकारि राहुल दिवेदी, जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरबीकर आदी उपस्थित होते.