कोविड लसीकरण अभियानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:25 AM2021-07-07T04:25:48+5:302021-07-07T04:25:48+5:30
श्रीरामपूर : गेल्या १८ दिवसांपासून येथील नगरसेवक दीपक चव्हाण व नगरसेविका वैशाली चव्हाण यांनी सुरू केलेल्या कोविड लसीकरण जनजागृती ...
श्रीरामपूर : गेल्या १८ दिवसांपासून येथील नगरसेवक दीपक चव्हाण व नगरसेविका वैशाली चव्हाण यांनी सुरू केलेल्या कोविड लसीकरण जनजागृती अभियानाचा माळवाडगाव येथे समारोप करण्यात आला.
अभियानाकरिता जनजागृती रथ, एलईडी स्क्रीन, पोवाडा, प्रश्नोत्तराचे व्हिडिओ यांचा आधार घेण्यात आला. शहरातील प्रत्येक प्रभाग व तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये हे अभियान राबविण्यात आले. यादरम्यान दोन हजार ७४० नागरिकांनी लसीकरणासाठी नावनोंदणी केली.
शहरातील मोरगे वस्ती, नॉर्दन ब्रँच परिसर, सूतगिरणी, गोपीनाथनगर, फातेमा हौसिंग, गोंधवणी रस्ता, संगमनेर रस्ता, शिवाजी रस्ता, सरस्वती कॉलनी, थत्ते मैदान आदी परिसरात तसेच ग्रामीण भागामध्ये टाकळीभान, बेलापूर, अशोकनगर, भोकर, हरेगाव, दत्तनगर, खंडाळा, माळवाडगाव, मुठेवाडगाव येथे जनजागृती करण्यात आली.
लसीकरणाबद्दल नागरिकांच्या शंकांचे निरसन करणे तसेच नावनोंदणी हा अभियानामागील उद्देश होता. ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी निरोपही यावेळी देण्यात आले.
नगराध्यक्षा अनुराधा आदिक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वसंत जमधडे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक संजय सानप, वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश बंड यांची याकामी मदत मिळाली, अशी माहिती नगरसेवक दीपक चव्हाण यांनी दिली.
-----------