भारतीय मजदूर संघाकडून जिल्ह्यातील कोविड योद्ध्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:20 AM2021-05-16T04:20:28+5:302021-05-16T04:20:28+5:30
अहमदनगर : जागतिक परिचारिका दिनानिमित्त भारतीय मजदूर संघाकडून जिल्ह्यातील विविध ठिकाणी परिचारिकांसह कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. गेल्या वर्षभरापासून ...
अहमदनगर : जागतिक परिचारिका दिनानिमित्त भारतीय मजदूर संघाकडून जिल्ह्यातील विविध ठिकाणी परिचारिकांसह कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.
गेल्या वर्षभरापासून डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, स्वयंसेवी संस्था, अनेक स्वयंसेवक कोरोना काळात रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी अव्याहत परिश्रम घेत आहेत. आपल्या कुटुंबाची काळजी घेत रुग्णसेवा करीत आहेत. त्यांच्या अविरत सेवेचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. त्यामुळे भारतीय मजदूर संघ जिल्ह्यातील परिचारिका व इतर कोविड योद्ध्यांचा सन्मान करत आहोत, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. नगर शहरातील भिंगार छावणी परिषद रुग्णालय, प्रोफेसर चौक, तहसील कार्यालयाजवळील लसीकरण केंद्र, जिल्हा रुग्णालय, केशव-माधव कोविड सेंटर, देशपांडे हाॅस्पिटल, महानगरपालिका कोविड सेंटर या ठिकाणी तर नगर तालुक्यात वाळकी, अरणगावसह श्रीगोंदा, जामखेड, राहाता, कोपरगाव, संगमनेर, अकोले तालुक्यात कोविड योद्ध्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेचे संजय दुधाने, दिनेश पुसदकर, अविनाश चारगुंडी, नंदकुमार चिंतामणी, प्रकाश नहार, सुजित उदरभरे, सुनील मुंगसे, संयुक्ता पोळ, जयश्री राहिंज, संदीप हापसे, राजेंद्र परदेशी, कृष्णा साठे, अविनाश कांबळे, कांता कांबळे आदींनी परिश्रम घेतले.
--
१५ भिंगार फोटो
भारतीय मजदूर संघाच्या येथील छावणी परिषदेच्या रुग्णालयात परिचारिकांचा सन्मान करण्यात आला.