जनावरांवरील उपचारासाठी काऊ लिफ्टिंग मशीन

By | Published: December 5, 2020 04:39 AM2020-12-05T04:39:42+5:302020-12-05T04:39:42+5:30

जिल्हा परिषद सेस योजनेतून जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना काऊ लिफ्टिंग मशीनचे वाटप करण्यात आले आहे. याप्रसंगी अध्यक्षा घुले बोलत होत्या. ...

Cow lifting machine for the treatment of animals | जनावरांवरील उपचारासाठी काऊ लिफ्टिंग मशीन

जनावरांवरील उपचारासाठी काऊ लिफ्टिंग मशीन

जिल्हा परिषद सेस योजनेतून जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना काऊ लिफ्टिंग मशीनचे वाटप करण्यात आले आहे. याप्रसंगी अध्यक्षा घुले बोलत होत्या. याप्रसंगी जि.प. उपाध्यक्ष प्रताप शेळके, पशुसंवर्धन आणि अर्थ समिती सभापती सुनील गडाख, सभापती मीराताई शेटे, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, रामभाऊ साळवे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शेळके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगल वराडे, डॉ. वृषाली भिसे, डॉ. चंद्रशेखर सोनावळे, ज्ञानेश्वर गांगर्डे यांच्यासह जिल्ह्यातील पशुधन पर्यवेक्षक, पशुधनविकास अधिकारी उपस्थित होते.

प्रताप शेळके म्हणाले की, वातावरणामुळे गायींमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण कमी होते. एकदा ती बसल्यावर तिला उचलण्यासाठी खूप अडचणी यायच्या. या पार्श्वभूमीवर काऊ लिफ्टिंग मशीन अतिशय फायदेशीर ठरणाऱ्या आहेत. जनावरांच्या बाजारात शेतकऱ्यांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होते. ती टाळण्यासाठीही सोनोग्राफी मशीन बसविण्याचे धोरण जिल्हा परिषद राबविणार आहे.

सुनील गडाख म्हणाले की, नगर जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याने सुविधा देताना अडचणी निर्माण होतात; पण जिल्हा परिषदेने कायम त्यावर मात केली आहे. अनेक वर्षांपूर्वी पशुधन कमी असतानाच्या काळात जिल्हा परिषदेने पंजाबमधून रेल्वेने गायी आणून दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन दिले. या व्यवसायातून अनेकांचे संसार उभे राहिले. महाराष्ट्रात कोणत्याच जिल्ह्यात नसलेले काऊ लिफ्टिंग मशीन नगर जिल्ह्यात उपलब्ध झाले आहे. जनावरांच्या बाजारात गाभण जनावराची निश्चित माहिती मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अनेकदा फसवणूक होते. हे टाळण्यासाठी लोणी, काष्टी, घोडेगाव येथील जनावरांच्या बाजारात सोनोग्राफी मशीन बसविणार असल्याचे त्यांनी सांगितले. २०० मशीनची खरेदी जिल्हा परिषदेने केली असून, ती संपूर्ण जिल्ह्यात वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. सुनील तुंभारे यांनी दिली.

----------

फोटो - ०४पशुसंवर्धन विभाग

जिल्हा परिषद सेस योजनेतून जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना काऊ लिफ्टिंग मशीनचे वाटपप्रसंगी जि.प. अध्यक्ष राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, सभापती सुनील गडाख, सभापती मीराताई शेटे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Cow lifting machine for the treatment of animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.