नेवासा, शेवगावात भाकपचे केंद्र सरकाविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:15 AM2021-07-01T04:15:41+5:302021-07-01T04:15:41+5:30

नेवासा : पेट्रोल-डिझेल-गॅसची कमालीची झालेली भाववाढ, जीवनावश्यक वस्तूंच्या आकाशाला भिडलेल्या किमती, महागाई रोखण्यात केंद्र सरकारला आलेले अपयश, याबाबींचा निषेध ...

CPI (M) agitation in Shevgaon, Nevasa | नेवासा, शेवगावात भाकपचे केंद्र सरकाविरोधात आंदोलन

नेवासा, शेवगावात भाकपचे केंद्र सरकाविरोधात आंदोलन

नेवासा : पेट्रोल-डिझेल-गॅसची कमालीची झालेली भाववाढ, जीवनावश्यक वस्तूंच्या आकाशाला भिडलेल्या किमती, महागाई रोखण्यात केंद्र सरकारला आलेले अपयश, याबाबींचा निषेध करत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने बुधवारी नेवासा, शेवगाव तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शेवगाव येथे केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

नेवासा येथे सकाळी अकराच्या सुमारास नायब तहसीलदार संजय परदेशी, सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर

यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कॉ. बाबा अरगडे, कॉ. बन्सी सातपुते, आप्पासाहेब वाबळे, भारत अरगडे, दत्ता गवारे, संजय फुलमाळी, भाऊसाहेब अरगडे, लक्ष्मण कडू, नामदेव गोरे, लक्ष्मण शिंदे, नंदू उमाप, सुनील उमाप आदी उपस्थित होते.

क्रूड ऑईलच्या किमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात घट झाली असताना आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. इंधन दर वाढीमुळे अन्नधान्य व जीवनाश्यक वस्तूंची वाहतूक महाग झाली. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे गोरगरीब जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहे. गॅस सिलिंडरच्या किमती कमी करून त्यावरील सबसिडी पुन्हा सुरू करा, गरिबांची थट्टा आणि फसवणूक करणारी उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना व इतर जनतेला रॉकेल मुक्तीच्या नावाखाली बंद केलेला केरोसीन पुरवठा पुन्हा सुरू करा, रेशन दुकानातून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा मुबलक प्रमाणात करा, प्रत्येक कुटुंबाला १० हजार रूपयांची आर्थिक मदत करा, खते, बियाणे जीएसटी मुक्त करा आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.

शेवगाव येथील क्रांती चौकात सकाळी अकराच्या सुमारास भाकपच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. महागाई रोखण्यास अपयशी ठरल्याचा आरोप करत केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे ही दहन करण्यात आले. यावेळी भाकपचे सचिव काॅ. सुभाष लांडे, संजय नांगरे, बापूराव राशीनकर, राम पोटफोडे, आत्माराम देवढे, भगवान गायकवाड, सय्यद बाबूलाल, क्रांती मगर, अजहर पिंजारी, रवींद्र लांडे, अमोल तुजारे, सुरेश मगर, जय मगर, दीपक गारोळे आदी उपस्थित होते. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

---

३० नेवासा निवेदन

नेवासा येथे भाकपच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर यांना निवेदन देण्यात आले.

Web Title: CPI (M) agitation in Shevgaon, Nevasa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.