पालकमंत्री राम शिंदे यांच्या निवासस्थानाकडे जाणा-या रस्त्यावरील गटार फुटली : नागरिकांचे घंटानाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 05:31 PM2018-08-01T17:31:47+5:302018-08-01T17:32:10+5:30
अहमदनगर : धर्माधिकारी मळा येथील पालकमंत्री राम शिंदे यांच्या निवासस्थानाकडे जाणा-या रस्त्यावर गटारीचे मैलमिश्रीत पाणी आल्याने संपुर्ण परिसरात दुर्गंधी ...
अहमदनगर : धर्माधिकारी मळा येथील पालकमंत्री राम शिंदे यांच्या निवासस्थानाकडे जाणा-या रस्त्यावर गटारीचे मैलमिश्रीत पाणी आल्याने संपुर्ण परिसरात दुर्गंधी पसरुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा व स्थानिक नगरसेवक याकडे दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त नागरिकांनी पिपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने घंटानाद आंदोलन केले.
अनेक दिवसापासून धर्माधिकारी मळा परिसरातील ग्रीनपार्क येथील भुमीगत गटार फुटल्याने मैलमिश्रीत पाणी रस्त्यावर येऊन त्याचे डबके साचले आहे. या घाण पाण्यामुळे डासाची उत्पत्ती होऊन साथीचे आजार पसरण्याची तसेच गटारी जवळून गेलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाइनमध्ये हे मैलमिश्रीत पाणी मिसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुगंर्धीने परिसरातील नागरिक त्रस्त झाले असताना आरोग्याच्या दृष्टीकोनाने मनपा प्रशासनास जाग आनण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. एका व्यावसायिकाने गटारीवर सिमेंट काँक्रीटचे कुंपण टाकल्याने ही भुमीगत गटार फुटली आहे. यामुळे टाकलेल्या कुंपनाच्या आत देखील मैलमिश्रीत पाण्याचे मोठे डबके साचले आहे. या भुमीगत गटारीवरील अनाधिकृत कुंपन हटवून या गटारीची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या आंदोलनात अॅड.कारभारी गवळी, शाहीर कान्हू सुंबे, ललिता गवळी, वसुधा शिंदे, यशवंत शिंदे, लक्ष्मण पवार, गणेश दाते आदींसह नागरिक सहभागी झाले होते. या भागात पालकमंत्री, उपायुक्त व महिला बाल कल्याण समितीच्या सभापती वास्तव्यास असून देखील या नागरी समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तातडीने या गटारीची दुरुस्ती न झाल्यास नगर-मनमाड रास्ता रोकोचा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.