महिलांनी गाजवले क्रिकेटचे मैदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:22 AM2021-03-10T04:22:40+5:302021-03-10T04:22:40+5:30
अहमदनगर : नगर क्लबच्या मैदानावर सुरू असलेल्या पीपीएल क्रिकेट स्पर्धेत जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा क्रिकेट सामना रंगला. पंजाबी सुपर ...
अहमदनगर : नगर क्लबच्या मैदानावर सुरू असलेल्या पीपीएल क्रिकेट स्पर्धेत जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा क्रिकेट सामना रंगला. पंजाबी सुपर क्वीन्स विरुद्ध रॉकिंग ब्ल्यूस या महिलांच्या संघात झालेल्या सामन्यात पंजाबी सुपर क्वीन्स संघाने विजेतेपद पटकाविले. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत क्रिकेटचे मैदान महिलांनीच गाजवले.
पंजाबी युथ ऑर्गनायझेशनच्यावतीने महिला दिनानिमित्त विशेष सामना खेळविण्यात आला. पंजाबी सुपर क्वीन्स कर्णधार नेहा देडगावकर-जग्गी तर रॉकिंग ब्ल्यूसच्या कर्णधार साक्षी कपूर होत्या. उत्कृष्ट फलंदाज जागृती ओबेरॉय, उत्कृष्ट गोलंदाज गीता नय्यर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण डॉ. सिमरन वधवा तर वुमन ऑफ दी मॅच नेहा देडगावकर-जग्गी ठरल्या. क्रेजी प्लेअरचा मान कशीश ओबेरॉय यांनी पटकाविला.
या सामन्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून काका नय्यर, इंदरजीत नय्यर, प्रदीप पंजाबी, आगेश धुप्पड, जनक आहुजा यांच्या हस्ते विजेता संघ पंजाबी सुपर क्वीन्स व गुणवंत खेळाडूंना चषक व बक्षिसे देण्यात आली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सागर बक्षी, मोहित पंजाबी, हितेश ओबेरॉय, गौरव नय्यर, मनयोग माखिजा, प्रेती ओबेरॉय, बलजीत बिलरा, सावन छाब्रा, अनिश आहुजा, अभिमन्यू नय्यर, हर्ष बत्रा यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरजितसिंह वधवा यांनी केले.
--फोटो- ०९पंजाबी क्रिकेट
पंजाबी युथ ऑर्गनायझेशनच्यावतीने नगर क्लबच्या मैदानावर जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे क्रिकेट सामने झाले. यातील विजेत्या संघास चषक प्रदान करताना काका नय्यर, इंदरजीत नय्यर, प्रदीप पंजाबी, आगेश धुप्पड, जनक आहुजा आदी.