माहिती लपविल्याने वधू-वरासह १३ जणांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 04:21 PM2020-05-26T16:21:18+5:302020-05-26T16:22:13+5:30

कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर येथील एका व्यक्तीने आपल्या मुलीच्या लग्नाची परवानगी मिळावी यासाठी कोपरगाव तहसील कार्यालयात अर्ज केला होता. त्यात नवरदेव मुंबई येथील असताना तो कोपरगाव येथील असल्याची खोटी माहिती देऊन फसवणूक केली. त्यामुळे मंगळवारी (दि.२६) लग्नासाठी आलेल्या मुंबई येथील नवरदेव, नवरीसह दोन्हीकडील नातेवाईक अशा १३ जणांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime against 13 people including bride and groom for hiding information | माहिती लपविल्याने वधू-वरासह १३ जणांविरुध्द गुन्हा

माहिती लपविल्याने वधू-वरासह १३ जणांविरुध्द गुन्हा

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर येथील एका व्यक्तीने आपल्या मुलीच्या लग्नाची परवानगी मिळावी यासाठी कोपरगाव तहसील कार्यालयात अर्ज केला होता. त्यात नवरदेव मुंबई येथील असताना तो कोपरगाव येथील असल्याची खोटी माहिती देऊन फसवणूक केली. त्यामुळे मंगळवारी (दि.२६) लग्नासाठी आलेल्या मुंबई येथील नवरदेव, नवरीसह दोन्हीकडील नातेवाईक अशा १३ जणांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     याप्रकरणी कामगार तलाठी धनंजय गुलाबराव प-हाड यांच्या फिर्यादीवरून, उत्तम नबाजी भालेराव, राजू नारायण सरोदे, अलका राजू सरोदे, अम्रत रवींद्र सरोदे, रमेश गोडू धायेकेर (सर्व रा.माटुंगा, मुंबई ), रंजना विजय गायकवाड, शीतल विजय गायकवाड, सागर विजय गायकवाड (सर्व रा.मिलिंदनगर, कल्याण पश्चिम), आकाश राजू सरोदे, शुभम उत्तम भालेराव, संगीता उत्तम भालेराव, आश्लेषा उत्तम भालेराव, प्रेरणा उत्तम भालेराव ( सर्व. रा. मुर्शदपूर ता. कोपरगाव ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

     मुर्शदपूर येथील उत्तम नबाजी भालेराव यांनी २६ मे रोजी मुलीचे लग्न कोपरगाव येथील तरुणाशी ठरल्याचे सांगून त्याच्या परवानगीसाठी त्यांनी १९ मे रोजी तहसीलदार यांच्याकडे अर्ज दिला होता. त्यानुसार तहसीलदार यांनी लग्नासाठी नियम अटी घालून परवानगी दिली होती. मंगळवारी सकाळी तहसीेलदारांनी स्वत: जाऊन चौकशी केली असता नवरदेव हा कोपरगाव येथून नव्हे तर मुंबई येथून आला आहे. नवरदेव व त्याचे नातेवाईक यांच्याकडे मुंबई येथून कोपरगावात येण्यासाठीचा शासकीय ई पास नव्हता, असे उघडकीस आले. यामुळे प-हाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे.  नवरदेवाकडील कार (क्र.एम.एच.०५, डी.एस. १३०७ ) जप्त केली असून याप्रकरणी पुढील तपास सहायक फौजदार शैलेंद्र ससाणे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप काळे हे करीत आहेत.  

Web Title: Crime against 13 people including bride and groom for hiding information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.