श्रीगोंदा येथील जात पंचायतमधील हाणामारीप्रकरणी ६६ जणांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 08:03 PM2018-07-12T20:03:31+5:302018-07-12T20:03:54+5:30

श्रीगोंदा साखर कारखाना येथील जोशी वस्तीवरील नंदीवाले समाजाची जातपंचायत चालू असताना मोबाईलवरील चित्रीकरणावरुन दोन गटात झालेल्या हाणामारीप्रकरणी ६६ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तलवारीने झालेल्या मारहाणीत सुमारे २५ जण जखमी झाले.

Crime against 66 people accused in Sringoda's caste panchayat | श्रीगोंदा येथील जात पंचायतमधील हाणामारीप्रकरणी ६६ जणांविरोधात गुन्हा

श्रीगोंदा येथील जात पंचायतमधील हाणामारीप्रकरणी ६६ जणांविरोधात गुन्हा

श्रीगोंदा : श्रीगोंदा साखर कारखाना येथील जोशी वस्तीवरील नंदीवाले समाजाची जातपंचायत चालू असताना मोबाईलवरील चित्रीकरणावरुन दोन गटात झालेल्या हाणामारीप्रकरणी ६६ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तलवारीने झालेल्या मारहाणीत सुमारे २५ जण जखमी झाले. दोन तरुणींना विवस्त्र करण्यात आले. याबाबत दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या. त्यानुसार तब्बल ६६ जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे.
बायडाबाई भीमा फुलमाळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सुरेश भीमा पालवे, चंदर्या भीमा पालवे, भीमा हनुमंत पालवे, आण्णा बाबू गायकवाड, गंगा बाबू गायकवाड, गंगा हनुमंत पालवे, भाऊसाहेब गंगा पालवे, अनिल गंगा पालवे, माणिक उत्तम गायकवाड, कान्हू बाबू गायकवाड, राजेश बाजीराव गायकवाड, रामा बाजीराव गायकवाड, बाबू बाजीराव गायकवाड, बाबू बाजीराव फुलमाळी, गुलाब सटवा गायकवाड, रामा सटवा गायकवाड, सुनील रामा गायकवाड, बापू गोविंदा गायकवाड, अनिल रामा गायकवाड, भानुदास बापू गायकवाड, सुरेश भीमा गायकवाड, भीमा सटवा गायकवाड, सुरेश उत्तम गायकवाड, रावसाहेब रामा गायकवाड, दगडू रामा गायकवाड, मालन भीमा पालवे, रंगू गंगा पालवे, आक्काबाई रामा गायकवाड, शांताबाई उत्तम गायकवाड, अलकाबाई बापू गायकवाड, मंगल बापू गायकवाड, भामाबाई कान्हू गायकवाड, नरसाबाई बाजीराव फुलमाळी, शांताबाई भीमा गायकवाड, बायडबाई बाजीराव गायकवाड, सर्जेराव बाजीराव गायकवाड, ताराबाई बाबू गायकवाड (सर्व रा. जोशी वस्ती, लिंपणगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
रंगू गंगाराम पालवे यांच्या फिर्यादीवरुन रामा रायबा फुलमाळी, तात्या शिवराम गायकवाड, सायाबा रंगनाथ उमरे, रावसाहेब तात्या गायकवाड, उत्तम रंगनाथ उमरे, शिवराम गंगाराम दिंगरे, आण्णा अश्रू फुलमाळी, भीमा गोपाळ गायकवाड, रामा बाबूराव काकडे, शेटीबा रामा काकडे, शुभाष हनुमंत फुलमाळी, गंगा व्यंकट मले, सुभाष गंगा मले, रामदास गंगा मले, गोविंद बापू मले, सर्जेराव गोविंद मले, राजेश गोविंद पालवे, शालनबाई गोविंद पालवे, रामा बाबू काकडे, साहेबराव महादू काकडे, अनिल साहेबराव काकडे, सुनील साहेबराव काकडे, नेबर व्यंकट फुलमाळी, साहेबराव गुलाब काकडे, उत्तम बाबू काकडे, विनायक नेबर फुलमाळी, कान्हा बापू काकडे, भीमा सटवा गायकवाड, व्यंका बाबू काकडे, बाबासाहेब कान्हू काकडे (सर्व रा. जोशी वस्ती, लिंपणगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

या आरोपींना झाली अटक

श्रीगोंदा साखर कारखान्यावरील जोशीवाडीतील दंगल प्रकरणी सुरेश गायकवाड, अनिल पालवे, माणिक गायकवाड, सुनील गायकवाड, अनिल गायकवाड, कान्हू काकडे, बायडाबाई फुलमाळी यांना गुरुवारी अटक करण्यात आली. याप्रकरणात आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. या मारहाण प्रकरणी पोलिसांनी बुधवारी जोशीवाडीत ७३ जणांची धरपकड केली. जोशीवाडीत गडबड होऊ नये म्हणून राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिली.

सलाईन काढून पळाला आरोपी

बुधवारी झालेल्या हाणामारी प्रकरणात २५ जण दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाले. जखमी झाल्याचा बहाणा करून दवाखान्यात दाखल झालेल्या एका आरोपीने पोलीस अटक करणार असल्याची कुणकुण लागताच सलाईन काढून दवाखान्यातून पलायन केले.

जोशीवस्ती ओस

जोशीवस्तीवर मोठ्या प्रमाणावर नंदीवाले समाज आहे. पोलीस पकडतील या भितीपोटी अनेक जण फरार झाले. त्यामुळे जोशीवस्ती ओस पडली आहे. घरात कोणीही नसल्याने लहान मुले केविलवाणी झाली असून जनावरे चारा, पाण्यावाचून हंबरडा फोडू लागली आहेत.

Web Title: Crime against 66 people accused in Sringoda's caste panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.