आठ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हा; सुपा एमआयडीसी परिसरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 07:06 PM2020-02-19T19:06:28+5:302020-02-19T19:06:53+5:30
कोयत्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत आठ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी चार जणांविरुध्द सुपा पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे.
सुपा : कोयत्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत आठ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी चार जणांविरुध्द सुपा पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी तरुण अजित सुभाष थोरात या तरुणाने फिर्याद दिली आहे.
१४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते ८.३० वाजण्याच्या दरम्यान अजित थोरात यास आरोपी विश्वजित रमेश कासार (रा.वाळकी, ता. जि.अहमदनगर), सुनील फक्कड अडसरे (रा. शेडाळा, ता.आष्टी, जि.बीड), मनोज चोबे (रा.बाबुर्डी, खडकी,ता.जि.अहमदनगर), अमोल खरमाळे (रा.सुपा,ता.पारनेर) व त्यांचे इतर अनोळखी चार साथीदारांंनी जबरदस्तीने बिगर नंबरच्या एका कारमध्ये बसवून जुना सुपा एम.आय.डी.सी. परिसरात नेले. या ठिकाणी दुसºया एका काळ्या रंगाच्या कारमध्ये मनोज चोबे व त्याच्यासोबत दोन अज्ञात आरोपींनी थोरात यास उतरुन घेतले. तेथे विश्वजित कासार व त्यांच्या साथीदारांनी फिर्यादीस वारंवार आठ लाख रुपयांच्या खंडणी मागणी केली. यावेळी त्यांनी थोरात यास कोयत्याचा धाक दाखवून धमकी दिली, असे थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. सुपा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले व त्यांचे सहकारी पोलीस करीत आहेत.