जामखेडमध्ये संचारबंदीत विनामास्क फिरणा-या चार जणांविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 06:21 PM2020-05-04T18:21:30+5:302020-05-04T18:34:48+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जामखेड शहरात संचारबंदी लागू आहे. असे असताना कारमधून विनामास्क सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळल्याने तीन जणांवर तर देवदैठण येथे एक जणाविरुध्द जामखेड पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला.
जामखेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जामखेड शहरात संचारबंदी लागू आहे. असे असताना कारमधून विनामास्क सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळल्याने तीन जणांवर तर देवदैठण येथे एक जणाविरुध्द जामखेड पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला.
पोलीस कॉन्स्टेबल शांतीलाल खाडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शनिवारी सायंकाळी ७ वाजता आरोपी श्याम दत्तात्रय म्हेत्रे (वय ३१), सुरेश महादेव कुलथे (वय ६१), अंजली ज्ञानेश्वर कुलथे (वय ३१) हे सर्व जण जामखेड शहरातील मेनरोडवर पांढºया रंगांच्या कार (नं. एम.एच.-१७, बी. व्ही.९५६६) मधून विनामास्क आले. यावेळी त्यांची चौकशी केली असता ते विनाकारण फिरत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
दि. १ मे रोजी सकाळी सात वाजता तालुक्यातील देवदैठण गावात ग्रामसेविका प्रमिला बुधवंत, पोलीस पाटील प्रशांत भोरे, नागरीक अनिल भोरे हे पेट्रोलिंग करीत होते. यावेळी बबन रंगनाथ सरगर (रा. कळंबोली, ता. पनवेल, जि. रायगड) हा लॉकडाऊनचे उल्लंघन करून आला. विना मास्क फिरताना आढळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे ग्रामसेविका प्रमिला बुधवंत यांनी जामखेड पोलीस स्टेशनला बबन सरगर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पंधरा दिवसांपूर्वी असेच नान्नज, राजुरी व अरणगाव येथील सात जणावर गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण ११ जणांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.