वाळू उपसा रोखणा-या तरुणांवर गुन्हे : राहुरी पोलिसांत फिर्याद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 07:25 PM2018-06-10T19:25:32+5:302018-06-10T19:28:38+5:30
प्रवरा नदीपात्रात सुरू असलेला बेकायदा वाळू उपसा रोखणाºया कान्हेगाव येथील तरुणांवर ठेकेदारांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. तंटामुक्त गावात तस्करांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
श्रीरामपूर : प्रवरा नदीपात्रात सुरू असलेला बेकायदा वाळू उपसा रोखणाºया कान्हेगाव येथील तरुणांवर ठेकेदारांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. तंटामुक्त गावात तस्करांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
नदीपात्रात जातप व करजगाव (ता.राहुरी) येथे रात्री जेसीबी व पोकलॅन यंत्राने होणारा बेकायदा तरुणांनी रोखला होता. मात्र त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठेकेदाराकडून अनेकदा नियम डावलले गेले. हद्द सोडून श्रीरामपूर तालुक्यातील कान्हेगाव येथून उपसा केला गेला. त्यामुळे संतापलेल्या तरुणांनी धाडस दाखवले. मात्र त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वाळू उपशाचे पंचनामे करुन कारवाई केली नाही तर प्रांताधिकारी कार्यालयासमोर मंगळवारपासून ( दि.१२) उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस प्रकाश चित्ते, सामाजिक कार्यकर्ते शाम आसावा यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. महसूल खाते व पोलिसांनी या प्रकरणी ठोस कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. कान्हेगाव येथे मोठा तणाव निर्माण झाला आहे. जातप व करजगाव येथे प्रवरा नदीपात्रात रात्रंदिवस वाळू उपसा सुरु आहे. तहसीलदार अनिल दौंडे यांच्याकडे या संदर्भात वारंवार तक्रारी करण्यात आल्या. यापूर्वी गावकºयांनी दोनदा कान्हेगाव हद्दीतील वाळू उपसा रोखला होता. तहसीलदार सुभाष दळवी यांनी स्वत: भेट देऊन पाहणी केली. कान्हेगाव येथील सुमारे एक हजार ब्रास वाळू उपसण्यात आली. मात्र, तहसीलदार दळवी यांनी संबंधीतांना नोटीसा बजावहून उपयोग झाला नाही. राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे यांना या प्रकरणी कारवाई करावी असे सूचविले. मात्र दंड अकारण्यात आला नाही.
खोटे गुन्हे दाखल करणे, जिवे मारण्याच्या धमक्या गावकºयांना दिल्या जात आहेत. शनिवारी रात्री वाळू उपसा बंद पाडल्यानंतर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले. जेसीबीचा चालक अमोल राजू माने (वय २७) याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. नदीपात्रात वाळूने भरलेले डंम्पर वर काढण्यासाठी जेसीबी व बुलडोझरचा वापर केला जात होता. त्यावेळी गैरकायद्याची मंडळी जमवून लाथाबुक्क्याने मारहाण केली व जेसीबी तसेच डंम्परच्या काचा फोडल्या, असे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी दादा खरात, सोनू खरात, भावड्या खरात, हनुमंत खरात याचा मुलगा, अमोल खरात व इतर पाच ते सहा जणांविरुद्ध दंगल व मारहाणीचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार अनिल गायकवाड हे करीत आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात येईल. खोटे गुन्हे असल्यास उचित कारवाई करू असे त्यांनी सांगितले.
अतिरिक्त वाळू उपशाच्या पंचनाम्यावर सह्या करणाºया तरुणांना आरोपी करण्यात आले. तहसीलदार सुभाष दळवी यांच्या आदेशानुसार तलाठी व मंडल अधिकाºयांनी केलेल्या पंचनाम्यावर तरुणांनी सह्या केल्या होत्या.