दूध केंद्र चालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:19 AM2021-05-10T04:19:56+5:302021-05-10T04:19:56+5:30

राजेंद्र चांगदेव जरे (३१, रा. चंडकापूर) असे आरोपीचे नाव आहे. नगरच्या अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संजय शिंदे ...

Crime on milk center operator | दूध केंद्र चालकावर गुन्हा

दूध केंद्र चालकावर गुन्हा

राजेंद्र चांगदेव जरे (३१, रा. चंडकापूर) असे आरोपीचे नाव आहे. नगरच्या अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संजय शिंदे व अन्नसुरक्षा अधिकारी प्रदीप कुटे यांच्या पथकाने ३१ डिसेंबर २०२० रोजी चंडकापूर येथे जय भवानी दूध संकलन केंद्रावर छापा टाकला होता. त्यात भेसळीसाठी साठविलेली २५ किलो व्हे पावडर, १५२ किलो लिक्विड पॅराफिन व भेसळयुक्त ५३२ लिटर दूध असा ३० हजार २४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यावेळी दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबित केला होता. छाप्यात जप्त केलेले रसायनांचे नमुने नाशिक येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यात मानवी शरीराला अत्यंत घातक असलेल्या लिक्विड पॅराफिन या रसायनाची दुधात भेसळ असल्याचा अहवाल अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झाला. पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ तपास करीत आहेत.

.......

भेसळीसाठी रसायने कुठून आणली, या साखळीत किती जण आहेत, याची माहिती आरोपी राजेंद्र जरे सांगत नव्हता. मानवी आरोग्यास घातक दूधभेसळ मुळापासून नष्ट करण्यासाठी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

- संजय शिंदे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, नगर

Web Title: Crime on milk center operator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.