अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या विरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:24 AM2021-02-09T04:24:22+5:302021-02-09T04:24:22+5:30
----------- चोरट्यांनी कांद्यासह पिकअप चोरला अहमदनगर : पारनेर तालुक्यातील ढोकी शिवारात चोरट्यांनी कांद्याने भरलेला पिकअप चोरून नेला. ६ ...
-----------
चोरट्यांनी कांद्यासह पिकअप चोरला
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील ढोकी शिवारात चोरट्यांनी कांद्याने भरलेला पिकअप चोरून नेला. ६ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली. या प्रकरणी उमाजी गुणाजी गांगड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल कडूस हे पुढील तपास करत आहेत.
-------------
महसूल पथकाच्या ताब्यातून पळविला डम्पर
अहमदनगर : अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करताना मिळून आलेला डम्पर तहसील कार्यालयात घेऊन जात असताना आरोपीने हा डम्पर महसूल पथकाच्या ताब्यातून पळवून नेला. नगर तालुक्यातील कापूरवाडी येथे ६ जानेवारी रोजी ही घटना घडली. या प्रकरणी मंडलाधिकारी अनिल फक्कडराव तोरडमल यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून डम्परचालक संजय आसाराम धामने व डम्पर पळवून नेणारा बबलू संभाजी भगत (दोघे रा. कापूरवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक निरीक्षक देशमुख हे पुढील तपास करत आहेत.