लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणा-या ९ हजार जणांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 11:27 AM2020-05-06T11:27:19+5:302020-05-06T11:27:59+5:30

लॉकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यात नऊ हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

Criminal charges filed against 9,000 people for violating lockdown rules | लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणा-या ९ हजार जणांवर गुन्हे दाखल

लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणा-या ९ हजार जणांवर गुन्हे दाखल

अहमदनगर : लॉकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यात नऊ हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये, रस्त्यावर वाहने आणू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले होते़ या आवाहनानंतरही अनेकांनी नियमांचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी अशा लोकांविरोधात गुन्हे दाखल केले. तर विनाकारण जे वाहने घेऊन घराबाहेर पडले. त्यांची वाहने जप्त करण्यात आली आहेत. नियमांचे उल्लंघन करणा-यांविरोधात कारवाईची मोहिम सुरूच आहे. 
दरम्यान पर्यटन व्हिसाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प, जामखेड, नेवासा पोलीस ठाण्यात २९ परदेशी नागरिकांविरोधात गुन्हे दाखल आहेत. तसेच परदेशी व परप्रांतीय लोकांची ओळख लपवून ठेवत त्यांना आश्रय दिल्याप्रकरणी जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

Web Title: Criminal charges filed against 9,000 people for violating lockdown rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.