महापुरुषांच्या पुतळ्याचे विद्रूपीकरण करणाऱ्यांवर फौजदारी करा; स्थायी समितीच्या सभापतींचे प्रशासनाला आदेश

By अरुण वाघमोडे | Published: April 21, 2023 07:01 PM2023-04-21T19:01:48+5:302023-04-21T19:02:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : नगर शहरासह उपनगरात महापुरुषांसह आदर्श व्यक्तींचे २५ पुतळे आहेत. बहुतांशी ठिकाणी मात्र पुतळ्यांजवळ अतिक्रमणामुळे ...

Criminalize those who deface statues of great men; Order of the Chairman of the Standing Committee to the Administration | महापुरुषांच्या पुतळ्याचे विद्रूपीकरण करणाऱ्यांवर फौजदारी करा; स्थायी समितीच्या सभापतींचे प्रशासनाला आदेश

महापुरुषांच्या पुतळ्याचे विद्रूपीकरण करणाऱ्यांवर फौजदारी करा; स्थायी समितीच्या सभापतींचे प्रशासनाला आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : नगर शहरासह उपनगरात महापुरुषांसह आदर्श व्यक्तींचे २५ पुतळे आहेत. बहुतांशी ठिकाणी मात्र पुतळ्यांजवळ अतिक्रमणामुळे विद्रूपीकरण झाले
आहे. अनधिकृतरीत्या फ्लेक्स लावून पुतळे झाकून टाकले जातात. हे टाळण्यासाठी प्रत्येक पुतळ्याजवळ सूचनाफलक लावून कुणी अतिक्रमण केले अथवा फ्लेक्स लावले तर त्यांच्यावर थेट फौजदारी कारवाई करा, असे आदेश स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांनी प्रशासनाला दिले.

महापालिकेत सभापती गणेश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. २१) स्थायी समितीची सभा झाली. सभेला नगरसेवक विनित पाऊलबुधे, प्रदीप परदेशी, रुपाली वारे, पल्लवी जाधव, सुवर्णा कोतकर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे व विभागप्रमुख उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच सभापती
कवडे यांनी पुतळ्यांची काळजी घेण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या. ते म्हणाले, शहरात असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्याची महापालिकेकडून योग्य ती काळजी घेतली जात नाही.

बांधकाम विभागाने येत्या चार दिवसांत प्रत्येक पुतळ्याच्या ठिकाणी सूचना फलक लावा, त्यानंतरही पुतळ्याजवळ अतिक्रमण अथवा फ्लेक्स लावले तर संबंधित प्रभाग अधिकारी यांनी हे कृत्य करणाऱ्यांवर त्वरित गुन्हा दाखल करवा, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. 

Web Title: Criminalize those who deface statues of great men; Order of the Chairman of the Standing Committee to the Administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.