नगरमधील वाडिया पार्क क्रीडा संकुलामध्ये रंगणार क्रॉम्प्टन करंडक क्रिकेट स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 02:08 PM2017-12-22T14:08:38+5:302017-12-22T14:09:13+5:30
सी.जी.पॉवर अॅण्ड इंडस्ट्रियल सोल्यूशन्स लिमीटेड, अहमदनगर जिल्हा क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ३२ व्या क्रॉम्प्टन क्रिकेट स्पर्धेला रविवार ( २४ डिसेंबर) पासून सुरुवात होणार आहे. यंदाच्या स्पर्धेत २४ संघाचा सहभाग आहे.
अहमदनगर : सी.जी.पॉवर अॅण्ड इंडस्ट्रियल सोल्यूशन्स लिमीटेड, अहमदनगर जिल्हा क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ३२ व्या क्रॉम्प्टन क्रिकेट स्पर्धेला रविवार ( २४ डिसेंबर) पासून सुरुवात होणार आहे. यंदाच्या स्पर्धेत २४ संघाचा सहभाग आहे. उद्घाटनाचा सामना महिला संघामध्ये खेळविला जाणार असल्याची माहिती क्रॉम्प्टनचे व्हाईस प्रेसिडेन्ट रमेशकुमार एन. व जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव प्रा. माणिक विधाते यांनी दिली.
रविवारी २४ डिसेंबर रोजी स्पर्धेचे वाडिया पार्क क्रीडा संकुलात उद्घाटन होणार आहे. १९ वर्षाखालील २४ संघ यामध्ये सहभागी होणार आहेत. सामने ४० षटकांचे असून दररोज एक सामना खेळविला जाणार आहे. या स्पर्धेत मुंबई, पुणे, औरंगाबाद, जालना, जळगाव, नाशिक, बीड व परभणी येथील संघाचा सहभाग आहे. तसेच पाथर्डी, राहुरी, श्रीरामपूर तालुक्यातून प्रत्येकी ३ संघ स्पर्धेत उतरणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघाला ५१ हजार रुपये व ट्राफी, उपविजेत्या संघास ३१ हजार रुपये अशा स्वरुपाचे बक्षिस दिले जाणार आहे. याशिवाय मॅन आॅफ दि मॅच, सर्वोेत्तम गोलंदाज, सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम क्षेत्ररक्षण, मॅन आॅफ द सिरीज अशी विविध बक्षीस दिले जाणार आहेत. स्पर्धेचे यंदाचे ३२ वे वर्ष आहे. १९८६-८७ साली या स्पर्धेला सुरुवात झाली होती. याशिवाय प्रेक्षकांसाठी प्रश्न मंजुषेचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. विजयी प्रत्येकास तात्काळ बक्षीस दिले जाणार आहे.
सर्व सामने मॅटवर...
स्पर्धेचे सर्व सामने मॅटवरच होणार आहेत. जिल्हा क्रिकेट असोसिएशनने टर्फ विकेटसाठी सुरु केलेल्या प्रयत्नांना तांत्रिक अडचणीमुळे यश आले नाही. त्यामुळे अपेक्षित असतानाही यंदा टर्फ विकेट तयार झाली नाही. त्यामुळे यंदाही खेळाडूंना मॅटचाच आधार घ्यावा लागणार आहे.