२० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:19 AM2021-03-22T04:19:26+5:302021-03-22T04:19:26+5:30
अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने झाडे व विजेचे खांब कोलमडून पडली. तर काही ठिकाणी घरांचीदेखील पडझड झाली आहे. गव्हाची काढणी ...
अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने झाडे व विजेचे खांब कोलमडून पडली. तर काही ठिकाणी घरांचीदेखील पडझड झाली आहे.
गव्हाची काढणी सुरू असतानाच पाऊस आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यासह कांद्यालाही अवकाळीचा मोठा फटका बसला. फळ झाडेही उन्मळून पडल्याचे राहुरी परिसरात चित्र आहे.
मुळा धरणाच्या पायथ्याशी अनेक झाडे पडली असून विजेचे खांबही कोसळल्याने बारागाव नांदूर परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. शहरासह वांबोरी, देवळाली प्रवरा, म्हैसगाव, गुहा, उंबरे, ब्राह्मणी, टाकळीमिया, आडगाव, बाबुळगाव, डिग्रस, वळण, मानोरी, खडांबे यांसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे कोरोना तर दुसरीकडे इंधन दरवाढीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कायम आहे. अवकाळी गारांचा पाऊस झाल्याने राहुरी तालुक्यात हजारो हेक्टर क्षेत्र नुकसान झाले आहे.
....
मुळा धरणाच्या कडेच्या सुमारे २२ गावांतील पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कांदा, गहू, हरभरा, भाजीपाला व फळ पिके आदींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अंदाजे १५ ते २० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
- महेंद्र ठोकळे,
राहुरी तालुका कृषी अधिकारी.
....
अधिका-यांचा पाहणी दौरा
बारागाव नांदूर, मल्हारवाडी, कोळेवाडी, घोरपडवाडी, कुरणवाडी, मोमीन आखाडा, म्हैसगाव व अन्य गावांची पाहणी दौरा सुरू आहे. यामध्ये राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, तहसीलदार एफ.आर. शेख, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, कृषी उपविभागीय अधिकारी संजय काचोळे यांचा पाहणी दौरा सुरू आहे.
...
फोटो - २१ राहुरी चिक्कू
...
ओळ- राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील शेतकरी लतीफभाई देशमुख यांच्या चिक्कूच्या बागेत चिकूचा जमिनीवर पडलेला सडा.